मुरुड शहरात बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:07 AM2019-11-20T00:07:23+5:302019-11-20T00:07:30+5:30

संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; टपाल खात्याचा कारभार ठप्प

Marketing of BSNL Internet Service in Murud City | मुरुड शहरात बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा बोजवारा

मुरुड शहरात बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा बोजवारा

googlenewsNext

मुरुड जंजिरा : मुरुडमधील बीएसएनएल सेवा वारंवार खंडित पडल्याने एका राष्ट्रीयकृत बँकेला याचा चांगलाच फटका बसला होता. त्यामुळे त्यांनी खासगी कंपनीची सेवा सुरू केली. रायगड जिल्ह्यात बीएसएनएल सेवा वारंवार खंडित होत असताना वरिष्ठ अधिकारी लक्षच देत नसल्याने ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

मरुडमध्ये ११ नोव्हेंबरपासून बीएसएनएलची नेट सेवा बंद असल्याने मुरुड टपाल कार्यालयातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. रजिस्टर एडी व्यतिरिक्त इतर कोणतेही काम नेट नसल्याने होत नसल्याने टपाल खात्यातील पैसे लोकांना काढता व भरतासुद्धा येत नाहीत.
सध्या लग्नसराईचे दिवस असून लोकांना पैशाची गरज आहे. मात्र, नेटसेवा बंद असल्याने हक्काचे पैसे मिळत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. टपाल आल्यावर त्याची नोंद करण्याचे कामसुद्धा नेटवर आधारित असल्याने टपाल वितरण व्यवस्थेला मोठा फटका सहन करावा लागत आहे. असंख्य लोकांनी या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली असून बीएसएनएलने कारभार न सुधारल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

रायगडचे खासदार सुनील तटकरे लवकरच मुरुड दौºयावर येत असून बीएसएनएलचा कारभार सुधारण्याबाबत लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे काही ग्राहकांनी सांगितले. बीएसएनएल टॉवरला रेंज नसल्याने शेकडोच्या संख्येने मोबाइल बंद अवस्थेत आहेत. तर नेट नसल्याने बँक महसूल कार्यालये आदीचा कारभार गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प आहे.

याबाबत मुरुड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, बीएसएनएल नेट व भ्रमणध्वनी सेवा वारंवार बंद असल्याने असंख्य ग्राहक त्रस्त आहेत. तक्रार करूनसुद्धा तक्रारींचे निवारण होत नसल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे. बीएसएनएल कंपनीने आपला कारभार लवकरात लवकर सुधारावा, अन्यथा जनआंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Marketing of BSNL Internet Service in Murud City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.