रंगीबेरंगी राख्यांनी सजली पेणची बाजारपेठ

By Admin | Updated: August 27, 2015 00:51 IST2015-08-27T00:51:07+5:302015-08-27T00:51:07+5:30

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची वीण घट्ट करणारा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. आपल्या भाऊरायाला रेशमी बंधनात अडकविणारा रक्षाबंधनाची राखी खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरू आहे.

The market for diarrhea drinks with colorful drinks | रंगीबेरंगी राख्यांनी सजली पेणची बाजारपेठ

रंगीबेरंगी राख्यांनी सजली पेणची बाजारपेठ

पेण : भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची वीण घट्ट करणारा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. आपल्या भाऊरायाला रेशमी बंधनात अडकविणारा रक्षाबंधनाची राखी खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरू आहे. गोंडा, कुंदन, खड्याच्या, रुद्राक्ष, रत्न, सोने, चांदीचे वर्ख दिलेल्या विविध प्रकार व रंगीबेरंगी राख्यांनी पेणची बाजारपेठ सजली आहे. सध्या बाजारात राख्यांची खरेदी करण्यासाठी सजलेली दुकाने पेण बाजारपेठेत ग्राहकांसाठी खुली आहेत.
२९ आॅगस्ट, शनिवारी रक्षाबंधन सण असून त्या सणाच्या पार्श्वभूमीवर एरव्ही शुकशुकाट असलेल्या बाजारात सकाळ सायंकाळच्या वेळेस गर्दी वाढत आहे. तब्बल २ रु. पासून २५० रु.पर्यंतच्या आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध आहेत. पूर्वापार चालत आलेल्या या सणाचे महत्त्व आजही तेवढ्याच उत्साहाने अधोरेखित होत आहे. पवित्र राखीचा स्रेहबंधाचा धागा, विविध आकर्षक रुपांनी राख्यांवर साकारला आहे. बच्चे कंपनीसाठी ऐटदार अशा कार्टून कॅरेक्टर छोटा भीम, डोरेमॅन, स्पायडरमॅन, अंग्री बर्ड, बालगणेश, कृष्ण याचबरोबर बाहुबली, बजरंगी भाईजान लेबलच्या राख्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.
राखी बांधल्यानंतर बहिणींना भेटवस्तू म्हणून विविध गिफ्ट हॅम्पर्स आणि स्पेशल फेस्टीव्हल कलेक्शन उपलब्ध आहेत. स्वीट डीशमध्ये मिठाईसोबत चॉकलेट, कंदी पेढे बाजारात उपलब्ध आहेत. (वार्ताहर)

मोहपाडा बाजारपेठत गर्दी
मोहोपाडा : बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन हा सण काही दिवसांवर आल्याने रंगीबेरंगी राख्यांनी मोहोपाडा बाजारपेठेतील दुकाने सजली असून अनेक महिलांची आपल्या भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळते.मोहोपाडा बाजारपेठ ही रसायनी परिसराची मुख्य बाजारपेठ असल्याने आसपासच्या ग्रामीण भागातील महिलावर्गाची राखी खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.

Web Title: The market for diarrhea drinks with colorful drinks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.