सागरी सुरक्षा, दहशतवाद सतर्कता उजळणी मेळावा
By Admin | Updated: April 25, 2017 02:07 IST2017-04-25T02:07:54+5:302017-04-25T02:07:54+5:30
जिल्ह्यातील सागर रक्षक दलाचे सदस्य आणि सर्व पोलीस पाटील यांना सागरी सुरक्षा आणि दहशतवाद याबाबत

सागरी सुरक्षा, दहशतवाद सतर्कता उजळणी मेळावा
अलिबाग : जिल्ह्यातील सागर रक्षक दलाचे सदस्य आणि सर्व पोलीस पाटील यांना सागरी सुरक्षा आणि दहशतवाद याबाबत माहिती देण्याकरिता तसेच उजळणी व्हावी याकरिता रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी मेळाव्याचे आयोजन के ले होते.
सोमवारी येथील रायगड पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानावर झालेल्या या मेळाव्यात जिल्ह्यातील ७६० सागर रक्षक दल सदस्य व पोलीस पाटील यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी घेतला. गतवर्षभरात अत्यंत जबाबदारीने पोलिसांच्या सतत संपर्कात राहून तसेच स्वेच्छेने केवळ राष्ट्रीय सुरक्षिततेच्या ध्येयाने सक्रिय कार्यरत सागर रक्षक दल सदस्यांसह १९ जणांचा गौरव करण्यात आला.