शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रायगडात मनसेचं इंजिन आघाडीसाठी धावतंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 00:18 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रचाराचा झंझावात उभा केला आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : भारतीय जनता पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रचाराचा झंझावात उभा केला आहे. लाखोंच्या संख्येने राज यांच्या सभांना होणारी गर्दी भारतीय जनता पक्ष-शिवसेनेसाठी प्रचंड डोकेदुखी ठरत आहे. रायगड जिल्ह्यात मनसेची म्हणावी तशी ताकद नाही. परंतु राज यांच्या सभेतून किती मतदारांचे मत परिवर्तन होणार आणि त्याचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला होणार का ? यावरच खरे यशअपयश अवलंबून आहे.रायगड लोकसभा मतदार संघाचा विचार केल्यास आघाडीकडून सुनील तटकरे हे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजप-शिवसेना युतीचे अनंत गीते निवडणूक रिंगणात आहेत. १९ एप्रिल रोजी राज ठाकरे यांची महाड येथील चांदे मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता सभा पार पडणार आहे. सभेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे सरकार कसे फसवे आणि खोटारडे आहे यावर त्यांचा भर राहणार असल्याचे बोलले जाते.भाजपला मतदान करु नका असा थेट हल्ला त्यांनी आधीच्या आपल्या सभांमध्ये केला आहे. महाडमध्येही घणाघात होणार असल्याने सभेला गर्दी होणार आहे. आघाडीला मतदान करा असे ते थेट सांगत नसले तरी आघाडीसाठीच मनसेचे इंजिन धावत असल्याचे दिसून येते. शिवसेनेचे अनंत गीते यांच्यावर राज ठाकरे कसा निशाणा साधणार याचीही उत्सुकता मतदारांमध्ये आहे. आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मनसेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मतदारांच्या गाठी- भेटी, रॅली, प्र्रचार सभांना आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह उपस्थित राहत असल्याचे दिसूनयेते.>मनसेने लढवलेल्या इतर निवडणुकांचे काय झाले?मनसेने रायगड लोकसभेची जागा लढलेली नाही. पेण विधानसभा मनसे लढली होती. ग्रामपंचायत पंचायत समिती, जिल्हा परिषद नगर पालिका निवडणुकीत मनसेचे इंजिन धडधडले होते.दक्षिण रायगडमध्ये मनसेने बऱ्यापैकी प्रस्थ निर्माण करण्यास गेल्या काही वर्षांपासून सुरुवात केलेली आहे. पेण, रोहे, माणगाव, महाड, पोलादपूरमधील काही ग्रामपंचायतीत मनसेचे सदस्य आहेत.रायगड जिल्ह्यात मनसेकडे सुमारे २० हजारांच्या आसपास व्होट बँक आहे. रत्नागिरी-खेड नगर पालिकेमध्ये मनसेचा थेट नगराध्यक्ष निवडून गेलेला आहे. त्यामुळे मनसेचे महत्त्व वाढले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड