शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

माणगाव-दिघी रस्ता रुंदीकरण काम अडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 04:22 IST

म्हसळा शहरात माणगाव ते दिघी रस्ता काँक्रीटीकरणाचे काम नागरिकांनी गुरुवारी बंद पाडले.

- अरुण जंगम म्हसळा : म्हसळा शहरात माणगाव ते दिघी रस्ता काँक्रीटीकरणाचे काम नागरिकांनी गुरुवारी बंद पाडले. या वेळी कंत्राटदार व ग्रामस्थ यांच्यात रस्त्याची उंची व जागेचा मोबदला यावरून वाद निर्माण झाला होता; परंतु म्हसळा तहसीलदारांच्या मध्यस्थीने चर्चा केल्यानंतर, जोपर्यंत कागदी प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत काम थांबविण्याचे आश्वासन देण्यात आले.माणगाव ते दिघी या ५८ कि.मी. रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण गेल्या एका वर्षापासून सुरू आहे. दोन दिवसांपासून हे काम म्हसळा पोलीस चेकपोस्टपासून पुढे म्हसळा शहारात करण्यात येत आहे. यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन ठिकाणी मोरीचे काम सुरू आहे. मात्र, ज्यांच्या जागेत हे काम केले गेले, यांना लेखी सोडाच; पण साधी तोंडी कल्पनाही दिली गेली नाही. तसेच या ठिकाणी टाकलेल्या मोरीमुळे रस्त्याची उंची वाढल्याने बाजूची जागा जवळ जवळ ६ फूट खोल जाणार आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी परिसरातील काम बंद पाडले. म्हसळा तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके व म्हसळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हे या वेळी हजर होते.ग्रामस्थांचा चढलेला पारा पाहून संबंधित कंत्राटदार समोर यायला तयार नव्हता; परंतु तहसीलदारांच्या सांगण्यावरून कंत्राटदार हजर झाल्यावर ग्रामस्थांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले. वाद वाढल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण होत असल्याचे लक्षात येताच तहसीलदार झळके यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता यांच्याशी ग्रामस्थांचा व बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केल्याने वाद निवळला. शुक्रवारी तहसीलदार दालनात दुपारी ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उप अभियंता सचिन निफाडे यांना रस्त्याची उंची व जमिनीचा मोबदला या प्रश्नावरून धारेवर धरले.संपादित जागेची मोजणी प्रक्रि या तसेच हद्द कायम करण्यात आलेली नाही, त्यामुळे अजून या रस्त्यामुळे बाधित शेतकºयांना कोणतीही नोटीस देण्यात आली नाही, असे उत्तर या वेळी निफाडे यांनी दिल्याने ग्रामस्थ संतापले आणि जोपर्यंत रस्त्याची उंची योग्य करण्याचे लेखी पुरावे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून मिळत नाहीत, तोपर्यंत काम बंदच ठेवण्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.अजूनही जागा मोजणीचे तसेच हद्द कायम करण्याचे काम झालेले नाही. हे काम येत्या काही दिवसांत पूर्ण करू, तसेच रस्त्याच्या उंची संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून नियोजित प्लॅनमध्ये योग्य बदल करून पर्याय काढण्याचा प्रयत्न करू.- सचिन निफाडे, उप अभियंता, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळमाणगाव-दिघी महामार्गावरील म्हसळ्यातील रस्त्यालगतची जागामोजणी वेगाने होण्यासाठी जातीने लक्ष घालणार. रस्ता रुं दीकरणामुळे बाधित शेतकºयांना मोबदल्यासंदर्भात श्रीवर्धन, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांचे मार्गदर्शन घेणार आहे.- रामदास झळके,तहसीलदार, म्हसळा

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRaigadरायगड