शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

माणगाव स्फोट प्रकरण : क्रिप्टझो कंपनीच्या मालकासह दोन संचालकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 3:06 AM

कच्चा माल साठवण्याच्या जागी आग विझवण्याचे प्रात्यक्षिक

माणगाव : तालुक्यातील विळेभागाड औद्योगिक क्षेत्रातील क्रिप्टझो इंजिनीअरिंग प्रा. लि. कंपनीत शुक्रवारी सायंकाळी स्फोटप्रकरणी कंपनीचे मालक व तीन संचालकांपैकी दोघांवर माणगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, यातील एक संचालक रवी शर्मा अद्याप मोकाट आहे.क्रिप्टझो कंपनीचे मालक सुरेश शर्मा यांनी कामगारांच्या सुरक्षेत हलगर्जी केल्याचे तपासात उघड झाले आहे. कंपनीमधील रॉ मटेरियल रूममध्ये कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. तसेच जी जागा कच्चा माल साठविण्यासाठी मंजूर करण्यात आली होती, त्या ठिकाणी आग विझविण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.कंपनीतील संचालक अशोक कोटियन व सचिन दारणे यांनी कंपनीच्या रॉ मटेरियल रूममध्ये आग विझविण्याचे प्रात्यक्षिक घेताना कामगारांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा केला.रॉ मटेरियल रूममध्ये लावलेल्या आगीवर रॉ मटेरियल रूमच्या छतास असलेल्या नोझलमधून गॅस सोडल्यानंतर आग जास्त भडकली व रूममध्ये मोठ्या प्रमाणात गॅस तयार होऊन लाकडी दरवाजा तोडून आगीच्या ज्वाळा बाहेर आल्या. यात रूमच्या बाहेर उभे असलेले १८ कामगार त्या आगीमुळे भाजून गंभीर जखमी झाले. त्यातील राकेश राम हळदे व आशिष एकनाथ येरुणकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृतांच्या नातेवाइकांना तीस लाखांची मदत!अधिकारी व कंपनीमालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत व भरपाई मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी शनिवारी घेतली. या वेळी पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केली. मालकांनी मृतास पाच लाखांचे धनादेश दिले, तर जखमीस पाच लाख व त्याचा वैद्यकीय खर्च तसेच कामावर येईपर्यंत पगार देण्याचे कबूल केल्यावर मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मृतांच्या नातेवाइकांना पुढील तीन महिन्यांत प्रत्येक महिन्यास दहा लाख असे तीस लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले.सुरेश शर्मा हे कंपनीचे मालक व व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी कंपनीत सुरक्षेची काळजी न घेतल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय इतर संचालकांमध्ये अशोक कोटियन, सचिन धरणे, रवि शर्मा यांचा समावेश आहे. पैकी रवि शर्मा बाहेर होते, तर प्रात्यक्षिक वेळी अशोक कोटियन व सचिन धरणे उपस्थित होते. म्हणून या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रवि शर्मा उपस्थित नसल्याने त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही.- रामदार इंगवले, पोलीस निरीक्षक, माणगावरवि शर्मा व रमेश शर्मा कंपनीचे मालक असून, अशोक कोटियन व सचिन धरणे हे कर्मचारी संचालक (एम्प्लॉइज डायरेक्टर) आहेत. आम्ही यांच्यावर फॅक्टरी अ‍ॅक्टनुसार करवाई करणार आहोत.- अंकुश खराडे, कंपनी निरीक्षक, रायगड औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग उपसंचालक मंडळ