शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये मांडूळ सापाची तस्करी, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 17:35 IST

आंतराष्ट्रीय स्तरावर अतिसंरक्षीत वन्यजीव प्रजाती म्हणून घोषित ‘मांडुळ’या दोन तोंडांच्या सापांची तस्करी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील तिघांना रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने अटक केली आहे. 

ठळक मुद्देआंतराष्ट्रीय स्तरावर अतिसंरक्षीत वन्यजीव प्रजाती म्हणून घोषित ‘मांडुळ’या दोन तोंडांच्या सापांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना अटक. रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या तीन सापांची किंमत 1 कोटी 10 लाख रुपये असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.

जयंत धुळप

अलिबाग - आंतराष्ट्रीय स्तरावर अतिसंरक्षीत वन्यजीव प्रजाती म्हणून घोषित ‘मांडुळ’या दोन तोंडांच्या सापांची तस्करी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील जयंत बाळकृष्ण देशमुख (59), मिलींद भास्कर मोरे (46) आणि रोहीदास लक्ष्मण तांडेल (44) या तिघांच्या टोळीला रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने अटक केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 6.45 वाजता पाली-सुधागड जवळील राबगांव येथे सापळा रुचून रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन तोंडांचे तीन मांडुळ साप जप्त करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या तीन सापांची किंमत 1 कोटी 10 लाख रुपये असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.हॉटेल राबगांव व्हिलेज येथे सापळा रचून अटक

रायगड जिल्हयात विविध वन्यजीव प्रजातीच्या प्राण्यांची व त्यांच्या अवयवांची विक्री होत असल्याबाबतची खात्रीशीर माहिती रायगडचे अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांना मिळाली होती. शुक्रवार 23 नोव्हेंबर रोजी तीन जण दोन तोंडीचे जीवंत मांडुळ साप विकण्यासाठी पाली(सुधागड) जवळच्या राबगांव येथील हॉटेल राबगांव व्हिलेज येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून हॉटेल राबगांव व्हिलेज येथे सापळा लावण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास खबऱ्याने दिलेल्या वर्णनाप्रमाणे तीन जण हॉटेल राबगावमध्ये येताना दिसले. त्यापैकी एकाच्या हातात पिवळया रंगाची कापडी पिशवी होती. त्याचा संशय आल्याने त्यांना हॉटेल राबगाव व्हिलेजमध्ये प्रवेश करीत असताना अटकाव करून त्यांच्याकडे विचारपूस करुन त्यांची अंगझडती घेतली असता त्या माणसाच्या हातातील पिवळया रंगाच्या पिशवीमध्ये तिन मांडुळ प्रजातीचे साप आढळून आले. काळी जादू व औषधी पदार्थ तयार करण्यासाठी मांडुळाचा उपयोग

चौकशी केली असता, त्यांनी हे सर्व साप विक्रीकरीता आणले असून त्याचा वापर हा काळी जादू व औषधी पदार्थ तयार करण्यासाठी होत असल्याचे सांगितले. तत्काळ या तिघांना अटक करुन त्यांच्या विरुद्ध पाली पोलीस ठाण्यात वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39(3) सह कलम 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्याकडे पूढील तपास

मांडुळ सर्प कोठून मिळविले व यापूर्वी किती सर्पांची विदेशात आंतराराष्ट्रीय टोळीला विक्री केली याबाबत पुढील तपास जयंत बाळकृष्ण देशमुख, मिलींद भास्कर मोरे आणि रोहीदास लक्ष्मण तांडेल या आरोपींना घेऊन पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे हे करित आहेत. दरम्यात जप्त करण्यात आलेले अतिसंरक्षीत वन्यजीव प्रजातीतील द्वीमूखी तिन मांडुळ साप सुरिक्षततेच्या दृष्टीने वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

टॅग्स :RaigadरायगडsnakeसापPoliceपोलिसArrestअटक