मनश्रीने मिळवला संविधानकन्येचा मान

By Admin | Updated: February 28, 2016 03:32 IST2016-02-28T03:32:23+5:302016-02-28T03:32:23+5:30

भारतीय नागरिकांना हक्क देऊन कर्तव्यांची जाणीव करून देणारे ‘भारतीय संविधान’ (राज्यघटना) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतास दिली. परंतु संविधान म्हणजे

Manashree achieved the value of constitutionalism | मनश्रीने मिळवला संविधानकन्येचा मान

मनश्रीने मिळवला संविधानकन्येचा मान

- जयंत धुळप,  अलिबाग
भारतीय नागरिकांना हक्क देऊन कर्तव्यांची जाणीव करून देणारे ‘भारतीय संविधान’ (राज्यघटना) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतास दिली. परंतु संविधान म्हणजे नेमके काय, त्यात नक्की काय आहे, भारतीय नागरिक म्हणून त्याच्याशी आपला नेमका संबंध काय, याची माहिती अनेकांना नसते. मात्र अवघ्या १२ वर्षांच्या मनश्रीने संविधान तोंडपाठ केल्याने अनोखा विक्रम केला आहे. ‘संविधानकन्ये’चा नावलौकिक मिळवणाऱ्या मनश्री आंबेतकरचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
अलिबाग नगरपालिकेच्या प्राथमिक शाळा (मराठी) क्र. १चे मुख्याध्यापक संतोष आंबेतकर यांची मनश्री ही कन्या. सेंट मेरी कॉन्व्हेंट शाळेत ती इयत्ता सातवीत शिकते. मनश्रीचे वडील संतोष यांना काही वर्षांपूर्वी त्यांच्या शैक्षणिक जीवनात मोठा अन्याय सहन करावा लागला. त्या घटनांनी तिच्या मनात घरच केले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही वडिलांना अन्याय सहन करावा लागला तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधीच्या काळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना किती अन्याय सहन करावा लागला असेल असा विचार सहावीतील मनश्रीच्या मनात आला. नागरिकशास्त्राच्या पुस्तकात तिने भारतीय संविधानाचा काहीसा अभ्यास केला होता. या साऱ्या परिस्थितीतूनच तिने भारतीय संविधान प्रथम वाचण्याचा चंग बांधला. मनश्रीच्या या कर्तृत्वाची दखल घेऊन, अलिबागमधील जय रोहिदास फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन आंबेतकर यांनी मनश्रीचा सत्कार केला.

सुट्टीत संविधानाचे वाचन-पाठांतर
मनश्रीने सहावीची परीक्षा संपताच वडिलांना संविधानाची प्रत आणून देण्यास सांगितले; आणि ते तोंडपाठ करण्याचा निर्धार केला. संविधानाचे प्रास्ताविक, अनुक्रमणिकेपासून २२ प्रकरणे, ३९५ कलमे, त्यांची उपकलमे, परिशिष्टे आणि अनुसूचीच्या काही दुरुस्त्या मनश्री १ तास १० मिनिटांमध्ये इंग्रजी भाषेतून बिनचूक तोंडपाठ म्हणून दाखविते.

आमच्या कुटुंबावर भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आहे. आयुष्यात जे काही कटू अनूभव आले त्या वेळी संविधानानेच मोठा आधार दिला. परिणामी, संविधान आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घरात मुलांना लहानपणापासूनच सांगत आलो आहे. त्यातूनच मनश्रीने स्फूर्ती घेऊन ही किमया करून दाखविली.
- संतोष आंबेतकर, मनश्रीचे वडील

Web Title: Manashree achieved the value of constitutionalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.