शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गोंदाव येथे एसटीला अपघात, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:45 IST

सुधागड तालुक्यातील गोंदाव येथील विद्यार्थ्यांना जांभूळ पाडा येथील आत्मोन्नती विद्यामंदिर या शाळेत आणताना कर्जत डेपोच्या एसटीचा तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला.

पाली : सुधागड तालुक्यातील गोंदाव येथील विद्यार्थ्यांना जांभूळ पाडा येथील आत्मोन्नती विद्यामंदिर या शाळेत आणताना कर्जत डेपोच्या एसटीचा तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. या वेळी चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधाने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती चालक सानप यांनी दिलीमंगळवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास गोंदाव येथून विद्यार्थी घेऊन ही एसटी निघाली असताना साधारण ९ ते ९.१५ दरम्यान कासईशेत गावाच्या तीव्र उतारावर एसटीचा डावीकडील ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर प्रसंगावधान राखून चालकाने पुढील तीव्र उताराचे वळण न मारता सरळ बस रस्त्याच्या समोरील बाजूला असलेल्या चारित उतरवली. त्यामुळे बसचे दोन्ही चाक खड्ड्यात गेल्याने आतील विद्यार्थ्यांना जोराचा झटका बसला; परंतु यात कोणालाही मार लागला नाही. सर्व विद्यार्थी सुखरूप बचावले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या बसमध्ये १४ विद्यार्थी व तीन प्रवासी होते. एसटीचा अपघात झाल्याचे समजताच पालकांनी घटनास्थळी धाव घेतली.अपघातग्रस्त एसटीला काढण्यासाठी गोंदाव येथील रमेश पाठारे यांचा जेसीबी व किशोर पाठारे यांनी साखळ दंड आणून चालक व वाहक यांना मदत केली. मानव विकासच्या एसटी तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करत असतात. ग्रामीण भागात डोंगराळ व तीव्र उताराचे रस्ते आहेत, अशा ठिकाणी एसटी पाठविताना डेपोकडून योग्य काळजी घेतली जात नाही, असे मत पालकांनी या वेळी व्यक्त केले. या एसटी बसची देखभाल दुरु स्ती, टायर आणि आतील स्वच्छता या बाबीकडे दुर्लक्ष केले जाते.चौकशीनंतर समजेल अपघाताचे कारण - यादवकर्जत डेपो मॅनेजर यादव म्हणाले की, सुधागड तालुक्यात हा अपघात घडला असल्याने ते पेण डेपोच्या अंतर्गत येते. पेण डेपोचे मॅनेजर घटनास्थळी निघाले असून त्याची चौकशी केल्यावर अपघाताचे कारण समजू शकेल.गाडीच्या देखभाल दुरुस्ती व टायर आणि स्वच्छता याबद्दल त्यांनी सर्व सकारात्मक उत्तरे दिली जर देखभाल होत असेल तर गाडीचे ब्रेक फेल कसे झाले याबद्दल मात्र त्यांनी तांत्रिक बाब असल्याचे सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात