मुख्य आरोपी शेकापचा कार्यकर्ता
By Admin | Updated: July 28, 2015 23:56 IST2015-07-28T23:56:43+5:302015-07-28T23:56:43+5:30
तालुक्यातील नारलेवाडी येथील राजू फार्ममध्ये पकडलेले दहा टन रक्तचंदन तस्करीप्रकरणी मुंबई चेंबूर येथील अकबर हुसेन आणि समीमखान हुसेखान पठाण यांचा शोध रायगड

मुख्य आरोपी शेकापचा कार्यकर्ता
कर्जत : तालुक्यातील नारलेवाडी येथील राजू फार्ममध्ये पकडलेले दहा टन रक्तचंदन तस्करीप्रकरणी मुंबई चेंबूर येथील अकबर हुसेन आणि समीमखान हुसेखान पठाण यांचा शोध रायगड पोलीस घेत आहेत. त्यातील फार्म हाऊसचा मालक असलेला अकबर हुसेन हा अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्तार् असून त्याची पत्नी शेतकरी कामगार पक्षाच्या मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. रक्तचंदन कंटेनरमध्ये अकबर हुसेन याच्या देखरेखीखाली भरले जात होते. गुजरात पाठोपाठ आता एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचे नाव समोर आल्याने खळबळ माजली आहे.
कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र ्रप्रदेश या राज्यात प्रामुख्याने चंदनाची झाडे आहेत. तेथील रक्तचंदनाची तस्करी करून तो माल जेएनपीटी बंदरातून राज्यात विविध भागात वाहतूक करून नेला जात असल्याचा संशय आहे. कर्जत -मुरबाड रस्त्याने ही तस्करी होत असल्याचा आरोप नेहमी होत असतो. त्याच रस्त्यावर साळोख गावाच्या हद्दीत नारळेवाडी भागात मुंबईच्या चेंबूर भागातील उद्योजक अकबर हुसेन उर्फ राजूभाई यांचा राजू फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊसमध्ये साठवून ठेवलेले रक्तचंदन चोरून आणलेल्या कंटेनरमध्ये भरले जात असताना पोलिसांनी वन विभागाच्या मदतीने धाड टाकली होती. तेथे पोलिसांनी पकडलेल्या रशीदखान पठाण याने फार्महाऊसमध्ये साठा करून ठेवलेले रक्तचंदन कंटेनरमध्ये भरताना फार्म हाऊसचे मालक अकबर हुसेन आणि त्यांचा मित्र शब्बीरखान पठाण असल्याचे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राजू फार्मची तपासणी केली असता तेथे अकबर हुसेन यांचा एक बॅनर मिळाला. काही आक्षेपार्ह वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. रक्तचंदन साठा फार जुना असल्याचा अंदाज वन अधिकारी आर. बी. घाडगे यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)