शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 09:18 IST

महाडमध्ये अजित पवार गट आणि शिंदेसेना तर रोहामध्ये अजित पवार गट आणि भाजपमध्ये राडा झाला. त्यामुळे दोन्ही ठिकाणी तणावाचे वातावरण होते.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १० नगरपालिकांसाठी मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेला महाड आणि रोह्यामध्ये  गालबोट लागले. महाडमध्ये अजित पवार गट आणि शिंदेसेना तर रोहामध्ये अजित पवार गट आणि भाजपमध्ये राडा झाला. त्यामुळे दोन्ही ठिकाणी तणावाचे वातावरण होते. दरम्यान, कर्जतमध्ये ईव्हीएम मशीन बिघाडामुळे मतदानात व्यत्यय आल्याने अनेक जण मतदान न करता निघून गेले, तर माथेरानमध्ये पाच लाखांची रोकड जप्त करण्यात आली. महाड, रोहा येथे झालेल्या राड्याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. 

रोहा नगरपालिका निवडणुकीत दुपारी प्रभाग ९ ‘ब’मधील अजित पवार गटाचे उमेदवार समीर सपकाळ यांनी बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. यावरून अजित पवार गट आणि भाजप कार्यकर्ते भिडले. रोहा पोलिसांनी  हस्तक्षेप करून सर्व प्रकार थांबविले आणि मतदान केंद्र सुरळीत सुरू ठेवण्यात आले. 

सायंकाळपर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती रोहा पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांनी दिली.

महाडमधील प्रभाग दोन आणि तीन या ठिकाणी मतदान सुरू होते; मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास शिंदेसेनेच्या विकास गोगावले यांचे कार्यकर्ते आणि अजित पवार गटाचे सुशांत जाबरे यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. 

त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. जाबरे यांच्या दोन गाड्या यावेळी फोडण्यात आल्या आहेत. जाबरे यांनी माझ्यावर पिस्तूल रोखले असून, ते पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याचे विकास गोगावले यांनी म्हटले आहे, तर काही कार्यकर्त्यांनाही जबर मारहाण झाली असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. कर्जत नगरपरिषदेसाठी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. मात्र, अनेक प्रभागांत मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन बंद पडू लागल्या होत्या. त्यामुळे अनेक मतदार हे मतदान न करता माघारी फिरले. तर अनेक मतदान केंद्रावर मतदारांसाठी सोयीसुविधा केल्या नसल्याने मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

शांतता भंग करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत : उपमुख्यमंत्री अजित पवार अलिबाग : महाडमध्ये अजित पवार गट आणि शिंदेसेना यांच्यात झालेल्या राड्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीत शांतता भंग करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी नाव न घेता मंत्री भरत गोगावले यांना दिला. 

आघाडी हा धर्म राजकीय वर्तुळातील सर्वांनी पाळला पाहिजे, परंतु त्याही पुढे जाऊन जो कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल किंवा जोर-जबरदस्तीने मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल, तो संविधानाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या मूल्यांच्या विरोधात वागत आहे, अशा प्रकारचे वर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे अजित पवार यांनी पुढे म्हटले आहे.

माथेरानमध्ये पकडली पाच लाखांची रोकड

माथेरान पोलिस ठाणे हद्दीत माथेरान नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना सकाळी सव्वा दहाच्या सुमारास प्रकाश राजेंद्र गुप्ता (वय ४०, रा. हॉटेल बाईक माथेरान, मूळ रा. इस्लामपूर, ता. जि. झुंझुनू, राजस्थान) हा लेकव्ह्यू हॉटेल माथेरान जवळ पिशवीमध्ये रक्कम घेऊन जात आहे, अशी माहिती मिळाली होती.

या ठिकाणी पोलिस कर्मचारी व स्थिर सर्वेक्षण पथक पाठवून पिशवी तपासली असता पाच लाख रोकड सापडली. ही रोकड पगार देण्याकरिता घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले.

बदलापुरात शिंदेसेना अन् भाजप कार्यकर्त्यांत राडा

बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या मतदान दरम्यान मंगळवारी अनेक ठिकाणी वादासह किरकोळ हाणामारीच्या घटना घडल्या. त्यामुळे काही भागांत तणावपूर्ण वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पडली. शिंदेसेना आणि भाजप या राज्यातील सत्ताधारी महायुती मधील पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे चित्र दिसले.  दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न करत होते. त्यामुळे निवडणुकीला काही अंशी गालबोट लागले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. 

काय काय घडले बदलापुरात?

पूर्वेकडे प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजप उमेदवार रमेश सोळसे यांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर शिंदेसेना-भाजप दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. यावेळी पोलिसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागला.  

आपल्या नावावर दुसऱ्याच महिलेने मतदान केल्याचा दावा एका महिलेने केला. अनन्या परब असे या महिलेचे नाव आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिचे आणि तिच्या पतीचे मतदार यादीत नाव होते. मात्र, मतदानावेळी आपल्या ऐवजी दुसरीच महिला मतदान करून गेली.  सकाळच्या सुमारास शिरगाव आपटेवाडी परिसरातील हेवन स्कूलमध्ये जवळपास पाऊण तास ईव्हीएम बंद असल्यामुळे मतदार ताटकळले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था केल्यानंतर मतदान पुन्हा सुरू झाले. तर  बदलापूर पश्चिमेकडील खामकर विद्यालयातील ईव्हीएम जवळपास तासभर बंद असल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Clash Erupts Between Allies During Raigad Municipal Elections; Violence Reported

Web Summary : Raigad municipal elections marred by clashes between ruling allies in Mahad, Roha, and Badlapur. EVM glitches and cash seizures added to the chaos. Ajit Pawar warned against disturbing peace.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकCrime Newsगुन्हेगारीRaigadरायगडPoliceपोलिस