शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Maharashtra Election 2019 : युतीमधील बंडखोरी टळली, उरण मतदारसंघातील पेच मात्र कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 03:06 IST

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेनेने परस्परांसमोर उमेदवार न देण्याची सामंज्यस्याची भूमिका घेतली आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेनेने परस्परांसमोर उमेदवार न देण्याची सामंज्यस्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे युतीमधील संभाव्य बंडखोरी टळली आहे. मात्र, उरण मतदारसंघातून भाजपचे महेश बालदी हे उमेदवारी अर्ज मागे घेणार का, याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या मतदारसंघातील शिवसेनेची अडचण कायम असल्याचे दिसते. रातोरात असे नेमके काय घडले, याबाबत दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांसमोर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भाजपचे बंडखोर उमेदवार अलिबाग, श्रीवर्धन, कर्जत या ठिकाणी उभे राहण्याच्या तयारीत असतानाच शिवसेनेने पेण विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची बुधवारी घोषणा केल्याने वरिष्ठ पातळीवरील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊन परस्परांना आव्हान उभे राहील, असे काहीच करायचे नसल्याचे ठरले. त्याबाबतचा संदेश त्या-त्या पातळीवरून जिल्हा पातळीवरील दोन्ही पक्षांच्या नेत्यांना देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील संभाव्य बंडखोरी रोखण्यात वरिष्ठांना यश आल्याचे बोलले जाते. मात्र, दोन्ही पक्षातील बंडखोर मनोमिलन झाल्याचे सांगत असले, तरी ते प्रामाणिकपणे काम करणार का? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे संभाव्य दगाफटक्याची टांगती तलवार भाजपसह सेनेच्या उमेदवारांवर राहणार असल्याचे बोलेले जाते.उरण मतदारसंघातून भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे मनोहर भोईर यांच्या पुढे आव्हान उभे केले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाही, हे आता ७ आॅक्टोबर रोजीच स्पष्ट होणार आहे. अलिबागमधून भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते हे इच्छुक असल्याने ते गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होते; परंतु वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्याने त्यांची भूमिका रातोरात बदली. गुरुवारी शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत अ‍ॅड. मोहिते आणि भाजप कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे या ठिकाणी शेकापचे सुभाष पाटील, शिवसेनेचे महेंद्र दळवी आणि काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर अथवा राजा ठाकूर लढत पाहायला मिळणार आहे.पेणमध्ये सरळ लढत१श्रीवर्धनमध्येही भाजपचे कृष्णा कोबनाक यांनीही माघार घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचे विनोद घोसाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्यात सामना रंगणार आहे, तसेच पेणमध्ये भाजपचे रवींद्र पाटील यांच्या विरोधात शेकापचे धैर्यशील पाटील यांच्यात सरळ लढत होणे अपेक्षित आहे.२कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड आणि शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्यात रंगतदार लढत अनुभवता येणार आहे. महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले विरुद्ध काँग्रेसचे माणिक जगताप, पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर आणि शेकापचे हरिश केणी अशी लढत होणार आहे.३भाजप आणि शिवसेनेच्या भूमिकेमुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टळणार आहे; परंतु बोहल्यावर चढवलेल्यांना माघार घ्यावी लागल्याने त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते मनापासून काम करणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raigadरायगड