महाड ते वडघर गिधाड संवर्धन सायकल रॅली

By Admin | Updated: February 22, 2016 00:40 IST2016-02-22T00:40:59+5:302016-02-22T00:40:59+5:30

गिधाड पक्षी संवर्धनाच्या जनजागृतीसाठी महाडच्या सह्याद्री मित्र आणि सीस्केप या संस्थांनी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत ४५ मुलांनी भाग घेतला. गोरेगाव येथे

Mahad to Wadghar Vulture Conservation Cycle Rally | महाड ते वडघर गिधाड संवर्धन सायकल रॅली

महाड ते वडघर गिधाड संवर्धन सायकल रॅली

माणगाव : गिधाड पक्षी संवर्धनाच्या जनजागृतीसाठी महाडच्या सह्याद्री मित्र आणि सीस्केप या संस्थांनी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत ४५ मुलांनी भाग घेतला. गोरेगाव येथे रॅलीचे स्वागत करण्यात येऊन सहभागी मुलांना खाऊ वाटण्यात आला.
एक गिधाड गेल्या महिन्यात महाडमध्ये उपासमारीमुळे मरणासन्न अवस्थेत आढळून आले. मृत जनावरांवर उपजीविका करून पर्यावरण स्वच्छ राखणारा आणि अन्न साखळीतील महत्वाचा दुवा असलेल्या या पक्ष्याचे संवर्धन करण्यासाठी महाड ते गोरेगाव लोणेरे परिसरात असलेल्या गावात गिधाडा विषयी जनजागृती करण्याचा कार्यक्र म चिपळूणच्या सह्याद्री निसर्ग मंडळसह महाडकरांनी घेतला आहे. त्या अंतर्गत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गोरेगाव येथे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन दिलीप शेट आदींनी या रॅलीचे स्वागत केले. (वार्ताहर)

Web Title: Mahad to Wadghar Vulture Conservation Cycle Rally