महाड-विन्हेरे मार्ग दरड कोसळल्याने बंद, दरड हटवून वाहतूक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 12:45 AM2020-07-10T00:45:40+5:302020-07-10T00:45:51+5:30

महाडमधून खेडकडे जाणाऱ्या महाड विन्हेरे नातुनगर या पर्यायी महामार्गावर बुधवारी रात्री कुर्ले गावानजीक असलेल्या धरणाजवळ मातीचा मोठा भराव रस्त्यावर आला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Mahad-Vinhere road closed due to collapse, traffic resumed | महाड-विन्हेरे मार्ग दरड कोसळल्याने बंद, दरड हटवून वाहतूक सुरू

महाड-विन्हेरे मार्ग दरड कोसळल्याने बंद, दरड हटवून वाहतूक सुरू

Next

दासगाव : महाड विन्हेरे नातुनगर या पर्यायी महामार्गावरील कुर्ले धरणाजवळ बुधवारी रात्री दरड कोसळून हा मार्ग वाहतुकीस बंद होता. गुरुवारी सकाळी दरड कोसळल्याचे निदर्शनास येताच सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र या ठिकाणी रस्ता रुंदीकरणासाठी केलेल्या खोदकामामुळे ही माती रस्त्यावर पडत असून आणखी काही ठिकाणी धोका कायम आहे.

महाडमधून खेडकडे जाणाऱ्या महाड विन्हेरे नातुनगर या पर्यायी महामार्गावर बुधवारी रात्री कुर्ले गावानजीक असलेल्या धरणाजवळ मातीचा मोठा भराव रस्त्यावर आला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आधीच रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा बंदी केल्याने या मार्गातील वाहतूक बंद असली तरी कुर्ले, आंबवली, रेवतळे, उंदेरी, शिरवली, विन्हेरे, फौजी आंबवडे आदी गावांतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करावा लागतो. यामुळे सकाळी महाडकडे दूध, भाजीपाला घेऊन येणाºया शेतकऱ्यांना आणि कारखान्यातील कामगारांना महाडमध्ये येता आले नाही. सकाळी सात वाजेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणीच अधिकारी अगर कर्मचारी तिकडे फिरकले नाहीत. त्यानंतर दरड कोसळल्याचे समजताच जेसीबीच्या साहाय्याने मातीचा भराव काढण्यास सुरुवात झाली. दुपारपर्यंत हा मार्ग खुला करण्यात आला.

कुर्ले ते महाडदरम्यान असलेल्या वळणदार रस्त्यातील माती हटवून वळणांची रुंदी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बाजूने संपूर्ण माती असल्याने मुसळधार पावसात ही माती सुटण्यास सुरुवात होते. गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसातदेखील अशीच स्थिती निर्माण झाली आहे. कुर्ले ते शिरगावदरम्यान अजून काही ठिकाणी अशीच दरड कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

खोदकाम के ल्याने माती येते खाली
कुर्ले ते महाडदरम्यान असलेल्या वळणदार रस्त्यातील माती हटवून वळणांची रुंदी वाढविण्यात आली आहे. शिवाय गतवर्षी ज्या ठिकाणी माती रस्त्यावर आली त्या ठिकाणीदेखील खोदकाम करण्यात आले. मात्र, वरील बाजूने संपूर्ण माती असल्याने पावसात ही माती सुटण्यास सुरुवात होते.

Web Title: Mahad-Vinhere road closed due to collapse, traffic resumed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड