शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

देव तारी त्याला कोण मारी...१७ तासांनंतर ६ वर्षांच्या चिमुरड्याला ढिगाऱ्याखालून काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 01:48 IST

Mahad Building Collapse: महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिकंदर अनवारे महाड : महाड शहरातील दुर्घटनाग्रस्त तारिक गार्डन इमारतीच्या ढिगाºयाखाली अडकलेल्या एका सहा वर्षांच्या मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. नशीब बलवत्तर म्हणून १७ तासांनंतर मोहम्मदला जीवदान मिळाले आहे, तर १८ तासांनंतर त्याच्या आईचा मृतदेह ढिगाºयाखाली सापडला आहे. मोहम्मदला जीवदान मिळाले असले, तरी मायेच्या आधाराला मात्र पोरका झाला आहे.

मोहम्मद बांगी असे या मुलाचे नाव आहे. ही इमारत २४ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कोसळली होती. या इमारतीच्या ढिगाºयाखाली हा मुलगा अडकला होता. तब्बल सतरा तासांनंतर मोहम्मद बांगी याला ढिगाºयाखालून सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. मोहम्मद ज्या ठिकाणी सापडला, त्या परिसरात त्याचे कुटुंबही सुखरूप सापडेल, असे बचावकार्य पथकाला वाटले होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

मोहम्मद जेथे सापडला त्याच परिसरात अधिक शोध घेतल्यानंतर, त्याच्या आईचा (नौशीन बांगी) मृतदेह बचावकार्य करीत आलेल्या पथकाला सापडला. मात्र, ढिगाºयातून बाहेर काढल्यावर त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घटनास्थळी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मुलगा वाचला, पण त्याची आई त्याला या मातीच्या ढिगाºयाखाली सोडून गेल्याने तो मायेच्या आधाराला मात्र पोरका झाला आहे.मोहम्मद सध्या सुखरूप असून त्याच्यावर महाड येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अगदी लहान वयातच मोहम्मदचे मायेचे छत्र हरवल्याने समाजातून हळहळ व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे मातीच्या ढिगाºयाखाली तब्बल १७ तास राहूनही आज मोहम्मद जिवंत असल्याने ‘देव तारी त्याला कोण मारी’ हा चमत्कारही पाहावयास मिळाला आहे.पाच जणांवर गुन्हा दाखलमहाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आरोपींना पकडण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी ‘लोकमत’ला दिली. दुर्घटनाप्रकरणी तारिक गार्डन इमारतीचे विकासक फारुक महामुदमिया काझी (प्रोप्रा. कोहिनूर डेव्हलपर्स तळोजा नवी मुंबई), वास्तुविशारद गौरव शहा (व्हर्टिकल आर्किटेक्ट अँड कन्सल्टन्सी नवी मुंबई), आरसीसी डिझायनर्स बाहुबली टी धावणे (श्रावणी कन्सल्टन्सी मुंबई), महाड नगरपालिके चे तत्कालीन कनिष्ठ पर्यवेक्षक शशिकांत दिघे आणि तत्कालीन नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक झुंजाड यांच्यावर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटना