शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

महाड दुर्घटना; १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचावकार्य सुरू; अजूनही ३ जण अडकल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 06:53 IST

दिवसभरात १२ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले

आविष्कार देसाई/संदीप जाधवरायगड/महाड : महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेमधील मृतांची संख्या आता १४ झाली आहे. ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली होती. दुर्घटनेनंतर रात्री उशिरा आठ जणांना ढिगाºयातून बाहेर काढण्यात आले होते. त्यातील एकाचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसºया जखमीचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. मंगळवारी दिवसभरात १२ मृतदेह ढिगाºयाखालून बाहेर काढले.

तारिक गार्डन ही पाच मजल्यांची इमारत सोमवारी संध्याकाळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. या इमारतीमध्ये ४१ सदनिका होत्या. त्यातील १८ सदनिका बंद होत्या, तर २३ सदनिकांमध्ये ८६ रहिवासी राहत होते. ८६ पैकी ६० नागरिक बाहेर गेले होते. त्यामुळे किमान २६ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली. २६ पैकी ११ जणांना बाहेर काढण्यात आले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. अजूनही तीन जण ढिगाºयाखाली अडकले असण्याची शक्यता आहे.मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदतमहाड इमारत दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या नातेवाइकांना राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून प्रत्येकी चार लाख रुपये तर मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपये असा एकूण पाच लाख रुपयांचा मदतनिधी दिला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे जखमी झालेल्या रहिवाशांना तातडीची मदत म्हणून २५ हजार रुपये आणि संपूर्ण उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.चौकशी समिती नेमलीइमारत दुर्घटनेच्या चौकशीसाठी कोकण विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिकेचे अधिकारी यांची एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.मृतांची नावेसय्यद हनीफ समीर (४५), नविद झमाले (२५), नौशीन नदीम बांगी (३५), आदी शेखनाग (१४), मतीन मुकादम (१७), फातिमा शौकत अलसुलकर (५८), रोशनबी दाऊदखान देशमुख (७०), इसमत हसीम शेखनाग (३५), फातिमा शाफिक अन्सारी (४३), अल्लतीमस बल्लारी (२७), शौकत आदम अलसुलकर (५०), आयेशा नदीम बांगी (७), रुकया नदीम बांगी (२), (एकाची अद्याप ओळख पटलेली नाही)

जखमींची नावे : स्वप्निल शिर्के (२९), नवीद दस्ते (३४), फरीदा शिराज कोर (६५), नमिश शोकत अलसुलकर (२९), संतोष सहानी (२४), जयप्रकाश कुमार (२४), दीपक कुमार (२१), मोहम्मद नदीम बांगी (६), मेहरूनिसा अब्दुल हमिद काझी (७५).

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाRaigadरायगड