अलिबागमध्ये बसला महाआघाडीला धक्का

By Admin | Updated: October 26, 2016 05:25 IST2016-10-26T05:25:31+5:302016-10-26T05:25:31+5:30

अलिबाग नगरपालिकेमध्ये शेकापला शह देण्यासाठी सर्वपक्षीयांच्या महाआघाडीमध्ये आम आदमी पार्टी (आप) सामील नाही. आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार

Mahaagadila push in Alibaug | अलिबागमध्ये बसला महाआघाडीला धक्का

अलिबागमध्ये बसला महाआघाडीला धक्का

अलिबाग : अलिबाग नगरपालिकेमध्ये शेकापला शह देण्यासाठी सर्वपक्षीयांच्या महाआघाडीमध्ये आम आदमी पार्टी (आप) सामील नाही. आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार नसल्याचे आपचे कार्यकर्ते दिलीप जोग यांनी स्पष्ट केले. आपच्या या स्पष्ट भूमिकेमुळे सर्वपक्षीय महाआघाडीला निवडणुकीआधीच चांगलाच धक्का बसल्याचे बोलले जाते.
शेकापची राजवट उलथवून टाकण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांची महाआघाडी झाली आहे. या आघाडीमध्ये मनसे, आप या सह अन्य पक्षांना सामावून घेण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमख दीपक रानवडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले होते. मात्र या महाआघाडीमध्ये आपने सामील नसल्याने महाआघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. आपने गेल्या दोन वर्षात सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर आवाज उठविला होता.
रस्ते, पाणी आणि आरोग्य सेवा यावर विविध आंदोलने आपने केली होती. त्यामुळे आपची जनसामान्यांमध्ये चांगलीच ओळख झाली होती.
अलिबाग नगरपालिकेमध्ये शेकापची एक हाती सत्ता आहे. विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याच नेतृत्वाखाली आताच्या निवडणुका लढण्याचे पक्षश्रेष्ठीने जाहीर केले आहे. प्रशांत नाईक यांची असलेली लोकप्रियता पाहूनच पक्षाने नाईक यांच्यावर पुन्हा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सोपवली आहे. त्यामुळे शेकापला टक्कर देणे कोणत्याही एका पक्षाला शक्य नाही. हे माहीत असल्यानेच काँग्रेस, शिवसेना, भाजपा या प्रमुख पक्षांनी महाआघाडीची मोट बांधली. त्यामध्ये छोट्या पक्ष्यांना सामावून त्यांना काही जागा देण्याचा फॉर्म्युला होता. मात्र आप या महाआडीत सामील होणार नसून कोणतीही जागा लढणार नसल्याचे आपचे दिलीप जोग यांनी स्पष्ट केले आहे.
आपमुळे महाआघाडीला निवडणुकीपूर्वीच जबरदस्त धक्का बसला आहे. निवडणुकीपूर्वीच असा धक्का बसल्याने महाआघाडीत बिघाडी झाल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)

अलिबाग नगरपालिकेमध्ये शेकापची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे शेकापची राजवट उलथवून टाकण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांची महाआघाडी झाली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच आपमुळे धक्का बसल्याने महाआघाडीत बिघाडी झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे महाआघाडीला शेकापला नामोहरण करण्यासाठी आणखीन ठोस पावले उचलावी लागणार असल्याचे दिसून येते. आप महाआघाडीत सामील होणे न होणे हा त्यांचा निर्णय आहे. परंतु महाआघाडी पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक रानवडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Mahaagadila push in Alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.