शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
2
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
4
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
5
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
6
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
7
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
9
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
10
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
11
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
12
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
13
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
14
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
15
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
16
Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ
17
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
18
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
19
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
20
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा

महाडमधील डोंगराळ भागांतील गावे दरडींच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:46 IST

महाड तालुक्यातील दासगाव, जुई, रोहन, कोंडिवते या गावांसह सर्वच डोंगराळ भागांतील गावांमध्ये २५ आणि २६ जुलै २००५ रोजी दरडी कोसळल्या. डोंगरांना भेगा गेल्या, तर महाड शहरासह सपाटीवर वसलेली गावे जलमय झाली.

दासगाव : महाड तालुक्यातील दासगाव, जुई, रोहन, कोंडिवते या गावांसह सर्वच डोंगराळ भागांतील गावांमध्ये २५ आणि २६ जुलै २००५ रोजी दरडी कोसळल्या. डोंगरांना भेगा गेल्या, तर महाड शहरासह सपाटीवर वसलेली गावे जलमय झाली. जुलै २००५ च्या या नैसर्गिक दुर्घटनेला आज १२ वर्षे पूर्ण होत असली, तरी या काळरात्रीच्या आठवणी आणि जखमा दरडग्रस्तांच्या जीवनात कायम आहेत. मूठभर दरडग्रस्त गावांमध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पुनर्वसनाचे काम प्रशासनाने राबवले असले, तरी महाड तालुक्यातील सर्वच डोंगराळ गावे आणि गावांतील रहिवासी आजही दरडीच्या छायेत जगत आहेत.जुलै २००५मधील २५ आणि २६ तारीख संपूर्ण महाडकरांना चिरंतन आठवणीत राहील, अशी आहे. या दिवशी दासगाव, जुई, रोहन, कोंडिवते या चार गावांमध्ये १८२ निष्पाप ग्रामस्थ डोंगरावरून येणाºया दरडीमध्ये गाडले गेले. संपूर्ण महाराष्टÑात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला होता. अवघा महाराष्टÑ प्रलयकारी पुरामध्ये वेढला गेला असल्याने अपेक्षित मदत पोहोचण्यास विलंब झाला. पुराचे पाणी आणि पावसाचा जोर ओसरल्यानंतर शासन आणि सामाजिक संस्थांनी महाडमधील दरडग्रस्त गावांना मदतीचा हात दिला. दरडीची माती काढणे, वाहून गेलेला रस्ता बनवणे, दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांना जेवण, राहणे, कपडे आदी सुविधा पुरवणे यासह दरडग्रस्तांच्या मृतदेहाची योग्य प्रकारे आणि सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करणे आदी महत्त्वपूर्ण कामे करण्यात आली. जनकल्याण ट्रस्ट, प्राइड इंडिया, लालबागचा राजा, सिद्धिविनायक ट्रस्ट आदी संस्थांनी दरडग्रस्तांना पक्क्या घरांसाठी मदत केली. शासनाने दिलेल्या मदतीच्या आवाहनाला सामाजिक संस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. महाडमधील दरडग्रस्तांना अन्न, वस्त्र, निवारा, सामाजिक सुविधा मिळाल्या. २००५च्या या दुर्घटनेला आता १२ वर्षे पूर्ण होत आहेत. २५ आणि २६ जुलै २००५मधील दरडग्रस्तांना मदत आणि पुनर्वसनाचा आधार मिळाला असला तरी जीवाभावाचे आप्तेष्ट, सगेसोयरे या काळरात्रीने हिरावून नेले याचे दु:ख आजही दरडग्रस्तांच्या मनात जखमांच्या रूपाने जिवंत आहे. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली, अशा दरडग्रस्त गावांना सर्वतोपरी मदत दिली. मात्र, दरडीचा धोका डोक्यावर असणारे संभाव्य दरडग्रस्त गाव आजही कायमस्वरूपी पुनर्वसनापासून वंचित आहेत.