शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

निवडणुकीसाठी उदंड उत्साह

By admin | Published: December 17, 2015 11:26 PM

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर प्रथम निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरावयाच्या शेवटच्या दिवशी १७ प्रभागांतून तब्बल ७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शिवसेना

म्हसळा : ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर प्रथम निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरावयाच्या शेवटच्या दिवशी १७ प्रभागांतून तब्बल ७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शिवसेना आणि भाजपा यांची युती झाली असून कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस यांनी आघाडी न करता स्वबळावर लढण्याची तयारी दाखविली आहे. म्हसळा नगरपंचायत निवडणुकीतील १७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरु वारी शेवटची तारीख असल्याने सकाळपासूनच तहसीलदार कार्यालयासमोर उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. म्हसळा नगर पंचायत ही पहिलीच निवडणूक भाजपा- शिवसेना युतीच्या माध्यमातून लढविली जात असून भाजपाला ३ तर शिवसेना ४ असा फॉर्म्युला निश्चित झाला. शिवसेना ४, राष्ट्रवादी १७, भाजपा ३, तर काँग्रेस १५, शेकापने २ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहे. तब्बल ३१ अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या निवडणुकीत बंडखोरी व अपक्षांच्या उमेदवारीने रंगत येणार आहे. शुक्र वारी छाननी असून २८ डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. (वार्ताहर ) माणगाव ११६, तळासाठी ७९ उमेदवारी अर्ज माणगाव नगरपंचायतीतील १७ जागांकरिता एकूण ११६ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती माणगांवचे तहसीलदार महेश सागर यांनी दिली आहे तर तळा नगरपंचायतीच्या १७ जागांकरिता ७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तळ््याचे तहसीलदार बी.बी.सावंत यांनी दिली आहे.पोलादपूरमध्ये ६४ उमेदवारी अर्ज दाखलपोलादपूर : नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ६४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.या निवडणुकीसाठी एकूण १७ प्रभागात ४,४६८ मतदार संख्या आहे. शिवसेना या एकमेव पक्षाकडून १७ प्रभागात २१ उमेदवारी अर्ज भरले असून १७ पैकी १७ प्रभागांमध्ये उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. तर काँग्रेस पक्षाने एकूण १३ प्रभागात एकूण १७ उमेदवारी अर्ज भरले आहेत. आणि राष्ट्रवादीने १७ प्रभागापैकी ०७ उमेदवार अर्ज दाखल केले तर भारतीय जनता पक्ष ०७, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ०४, शेतकरी कामगार पक्ष ०२, अपक्ष ०४, असे एकूण ६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.खालापूरमध्ये ८६ उमेदवार रिंगणातखालापूर : खालापूर ग्रा.पं.चे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाले असून या नगरपंचायतीची १७ जागांसाठी निवडणूक होत असून गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जवळपास ६४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. बुधवारी शेकापने २२ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. एकूण ८६ जागांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व शेकाप यांनी १७ तर मनसेने ८ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहे. काही अपक्षांनीही आपले उमेदवारी अर्ज भरले. ग्रामपंचायतीची नगरपंचायत होत असल्याने या प्रथम नगरपंचायतीवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवावा यासाठी सर्वच पक्ष व कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. खालापूर नगरपंचायतीसाठी पहिली सार्वत्रिक निवडणूक १० जानेवारीला होत आहे. भाजपा व काँग्रेस या पक्षाच्या वतीने काही प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.यावेळी शेकापचे तालुका चिटणीस संतोष जंगम यांनी शेकापच्या जवळपास सर्वच उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकारी दत्ता भडकवाड यांच्याकडे दाखल केले. तर शिवसेना, राष्ट्रवादी, शेकाप यांनी सर्वच्या सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. गुरुवारी दिवसभर तहसील कार्यालयात नेते व कार्यकर्त्यांची तोबा गर्दी पहावयास मिळाली. सेना व राष्ट्रवादीच्या वतीने मोठे शक्तिप्रदर्शन केलेले पहावयास मिळाले. सर्वच पक्षांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरल्याने सर्वच पक्षांनी एकला चलो रेची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले.