जागतिक बँकेची योजनेसाठी दिलेल्या मदतीवर नजर
By Admin | Updated: July 27, 2015 03:04 IST2015-07-27T03:04:11+5:302015-07-27T03:04:11+5:30
भारतातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये जागतिक बँक कोट्यवधी रुपयांची सढळ हस्ते मदत करीत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील

जागतिक बँकेची योजनेसाठी दिलेल्या मदतीवर नजर
आविष्कार देसाई , अलिबाग
भारतातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये जागतिक बँक कोट्यवधी रुपयांची सढळ हस्ते मदत करीत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय पेयजल योजना आणि जल स्वराज्य टप्पा- दोन या प्रकल्पांचा समावेश आहे. देण्यात येणाऱ्या मदतीवर जागतिक बँकेने आपली नजर रोखली आहे. त्यांच्याकडून वेळोवेळी आढावाही घेण्यात येणार असल्याने कागदावरील आणि जमिनीवरील कृतीबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता अपडेट राहावे लागणार आहे.
रायगड जिल्ह्यातील ८२४ ग्रामपंचायतींपैकी ४७१ ग्रामपंचायती निर्मल झाल्या आहेत, तर ३५३ ग्रामपंचायती निर्मल होणे बाकी आहे. या ग्रामपंचायती निर्मल करण्याकडे रायगड जिल्हा परिषदेचा कल असून २०१९ पर्यंत हे उद्दिष्ट गाठायचे आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेमार्फत प्रत्येकाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी देणे आणि जल स्वराज्य टप्पा दोनअंतर्गत टंचाईग्रस्त गावांना पिण्यासाठी शाश्वत पाणीपुरवठा करणे हे आहे. या प्रकल्पांसाठी जागतिक बँकेने कोट्यवधी रुपयांचा निधी भारत सरकारला देऊ केला आहे.
या निधीचा योग्य पद्धतीने वापर होतो की नाही यासाठी जागतिक बँकेने विविध पथके नेमली आहेत. रायगड, औरंगाबाद, पुणे आणि जळगाव या चार जिल्ह्यात जागतिक बँकेचे पथक पाहणी करणार आहे. याबाबतची तयारी सुरू असल्याची माहिती उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी दिली.