‘लोकमत आपल्या दारी’ आज चेंढरे गावात
By Admin | Updated: June 11, 2016 03:27 IST2016-06-11T03:27:33+5:302016-06-11T03:27:33+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आता वेगवेगळ्या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तडीस नेण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे.

‘लोकमत आपल्या दारी’ आज चेंढरे गावात
अलिबाग : केवळ व्यवसाय म्हणून नाही तर सामाजिक वसा जोपासण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आता वेगवेगळ्या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तडीस नेण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे या समस्या जाणून घेण्यासाठी आता ‘लोकमत चमू’ आपल्या परिसरात येत असून, ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्र माचे आयोजन शनिवारी ११ जून रोजी सकाळी १० वाजता चेंढरे ग्रामपंचायतीच्या सभागृहात करण्यात आले आहे.
चेंढरे ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्यावर उपाययोजना करणे, तसेच या समस्या सोडवण्याकरिता ‘लोकमत’ पाठपुरावा करणार आहे. शनिवारी सकाळी १० वाजता आयोजित या उपक्रमामध्ये नागरिकांना समाजिक समस्या, त्यांच्या अडचणी अशा विविध समस्या वा गाऱ्हाणी मांडता येणार आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेवून उपाययोजना करण्याकरिता चेंढरे ग्रामपंचायतीच्या सरपंच शारदा नाईक, उपसरपंच अॅड. परेश देशमुख यांच्यासह अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अभियंता सुनील प्रधान, अभियंता प्रथमेश पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
चेंढरे ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या समस्या, गाऱ्हाणी मांडण्याकरिता शनिवारी सकाळी १० वाजता चेंढरे ग्रामपंचायतीच्या सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.