लोकल धावणार :पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग दुहेरी, २१ नोव्हेंबरला चौक येथे सल्लामसलत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:38 AM2017-11-18T01:38:59+5:302017-11-18T01:39:08+5:30

पनवेल - कर्जत रेल्वे मार्ग २००७च्या सुमारास सुरू झाला. मात्र, या मार्गावरून मालवाहतूक सुरू झाली. लोकल प्रवासी वाहतुकीसाठी हा मार्ग उपयुक्त नाही

 Local running: Panvel-Karjat railway line doubles, consultation meeting at Chowk on 21st November | लोकल धावणार :पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग दुहेरी, २१ नोव्हेंबरला चौक येथे सल्लामसलत बैठक

लोकल धावणार :पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग दुहेरी, २१ नोव्हेंबरला चौक येथे सल्लामसलत बैठक

googlenewsNext

कर्जत : पनवेल - कर्जत रेल्वे मार्ग २००७च्या सुमारास सुरू झाला. मात्र, या मार्गावरून मालवाहतूक सुरू झाली. लोकल प्रवासी वाहतुकीसाठी हा मार्ग उपयुक्त नाही, असे सांगण्यात आल्यावर प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला. त्यानंतर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्या, परंतु कर्जतला काही गाड्यांचा थांबा नसल्याने असून अडचण अन् नसून खोळंबा अशी परिस्थिती प्रवाशांची झाली. मात्र, आता या मार्गाचे दुपदरीकरण होणार असून लोकल गाड्या धावतील असा लोहमार्ग तयार करण्यात येणार आहे. याकरिता महत्त्वपूर्ण सल्लामसलत बैठकीचे आयोजन मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वतीने चौक रेल्वे स्थानकामध्ये २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वतीने मुंबई शहर परिवहन प्रकल्प - ३ या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रकल्पाचा खर्च रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन पन्नास - पन्नास टक्के प्रमाणात करणार आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेचे अर्थसाहाय्य घेण्यात येणार असून प्रस्तावित पनवेल - कर्जत उपनगरीय ( लोकल ) रेल्वे मार्ग तयार झाल्यावर या मार्गावरून उपनगरीय सेवा म्हणजे लोकल सेवा सुरू करता येईल. या मार्गामुळे कर्जत ते मुंबई सीएसटीएम हे अंतर कमी होईल.
प्रस्तावित रेल्वे प्रकल्पासाठी पर्यावरण व सामाजिक मूल्यमापन जागतिक बँकेच्या मार्गदर्शन व साहाय्याने करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा तपशील, मार्ग व प्रकल्पाचे फायदे तसेच पर्यावरण आणि सामाजिक परिणाम (भूसंपादन, प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या भौतिक विस्थापना, जीवनावश्यक प्रक्रि यांवर परिणाम) आणि उपशमन उपाय, पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा संबंधित जोखीम बदल थोडक्यात चर्चा करण्यासाठी सार्वजनिक सल्लामसलत बैठकीचे आयोजन मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता चौक रेल्वे स्थानकावर करण्यात आले
आहे.
सर्व संबंधित नागरिकांनी तसेच प्रकल्पग्रस्त व्यक्तींनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वतीने देण्यात आले आहे. प्रकल्पाबाबतची माहिती कॉर्पोरेशनच्या चर्चगेट स्टेशन बिल्डिंगमधील कार्यालयात तसेच ६६६.े१५ू.्रल्ल्िरंल्ल१ं्र’६ं८२.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाइटवर उपलब्ध आहे. प्रकल्पासंबंधित पर्यावरणीय आणि सामाजिक पैलूंमध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक सल्लामसलत बैठकीत तोंडी किंवा लिखित स्वरूपात सूचना देऊ शकतात. तसेच अतिरिक्त माहिती किंवा शंका मुख्यप्रकल्प प्रबंधक - १, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मर्या. यांना ूस्रे१५ू’@ॅें्र’.ूङ्मे आणि ८िूस्रे’े१५ी@ॅें्र’.ूङ्मे या ई - मेलवर पाठवाव्यात असे त्यांनी प्रसिद्धिपत्रकात सूचित केले आहे.

Web Title:  Local running: Panvel-Karjat railway line doubles, consultation meeting at Chowk on 21st November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Karjatकर्जत