काशिद किनारी जीवरक्षकांमुळे वाचले तिघांचे प्राण
By Admin | Updated: January 14, 2017 07:01 IST2017-01-14T06:57:46+5:302017-01-14T07:01:10+5:30
मुरूड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारा हा सुप्रसिद्ध असून येथे दरवर्षी पाच लाखापेक्षा जास्त पर्यटक भेटी देत असतात. सफेद वाळू

काशिद किनारी जीवरक्षकांमुळे वाचले तिघांचे प्राण
नांदगाव/ मुरुड : मुरूड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारा हा सुप्रसिद्ध असून येथे दरवर्षी पाच लाखापेक्षा जास्त पर्यटक भेटी देत असतात. सफेद वाळू व निळाशार समुद्र पर्यटकांना भुरळ घालत असल्याने येथे प्रचंड प्रमाणात गर्दी असते. पुणे येथील धनकवडीजवळ असणारे पुणे इन्स्टिट्यूट आॅफ कॉम्पुटर टेक्नॉलॉजी येथील १५ जणांचा समूह काशिद समुद्रकिनारी फिरावयास आला होता. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान हे सर्वजण या ठिकाणी पोहचताच यातील १५ जण ही समुद्रात पोहावयास उतरले. काही वेळातच यातील तिघे जण खोल समुद्रात ओढले गेले. मात्र जीवरक्षकांमुळे या तिघांचे प्राण वाचले.
राजीव शर्मा, अक्षय जैन, अजय शर्मा हे तिघे खोल भागात गेल्याने त्यांनी मदतीची याचना केली. त्या सर्वांचा ओरडा पाहून समूहातील सर्वजणांनी मदतीची हाक मारली. समोरच स्पीड बोटीत जीवरक्षक तैनातच होते त्यांनी वेळ जाऊ न देता आपली बोट हे तिघे बुडत असलेल्या ठिकाणी नेली सर्व जीवरक्षकांनी त्वरित समुद्रात उडी घेत या सर्वाना बोटीत चढून सुखरूप किनाऱ्यावर आणले. तिघांना सुखरूप पाहून सर्व सहकाऱ्यांनी जीवरक्षकांचे आभार मानले.
जीवरक्षक राकेश रक्ते, दीपेश पवार, अमोल कासार, अनिल वाघमारे, भरत वाघमारे, सुनील वाघमारे या सर्वांचे काशीद ग्रामपंचायत सरपंच सविता वाळेकर आदींनी कौतुक के ले.