कारखान्यांना विरोध करू

By Admin | Updated: September 1, 2015 04:34 IST2015-09-01T04:34:40+5:302015-09-01T04:34:40+5:30

मुख्यमंत्र्यांनी कोकणात केमिक ल झोन यावा, असे सांगितले आहे. विविध उद्योग येणे गरजेचे आहे. मात्र केमिकल झोनच का? आणि तरीसुद्धा येणार असेल

Let's oppose the factories | कारखान्यांना विरोध करू

कारखान्यांना विरोध करू

धाटाव : मुख्यमंत्र्यांनी कोकणात केमिक ल झोन यावा, असे सांगितले आहे. विविध उद्योग येणे गरजेचे आहे. मात्र केमिकल झोनच का? आणि तरीसुद्धा येणार असेल तर त्यासाठी लागणाऱ्या आवश्यकता पूर्ण करायला हव्यात. जर आवश्यकता पूर्ण न करता प्रदूषणकारी कारखाने येणार असतील तर सत्तेत असलो तरी शिवसेना पूर्णपणे विरोध करेल असा इशारा आमदार भरत गोगावले यांनी दिला आहे.
पत्रकारांवरील हल्ले हा विषय प्रलंबित आहे, असे मान्य करून केवळ चुकीच्या पद्धतीच्या वार्तांकनाने वादंग निर्माण होतात व त्यातून हल्ल्याचे प्रकार घडतात, अशी भूमिका मांडून कायदा होण्यासाठी पाठपुरावा करू व लवकरात लवकर कायद्याबाबत प्रक्रिया पूर्ण करू असे आश्वासन दिले.धाटाव येथील आरआयआरसीच्या सभागृहात रोह्यातील सामाजिक क ार्यकर्ते महेश बामुगडे यांच्या दसबा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
कसेल त्याची जमीन हा विषय आम्हाला मान्य आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणेही गरजेचे आहे त्याबाबत दुमत नाही. मात्र त्यामुळे स्थानिकांवर अन्याय होता कामा नये व अशा लोकांसाठी शिवसेना आग्रही आहे. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या रुंदीकरणाला संबंधित ठेकेदार जबाबदार आहे. याबाबत आतापर्यंत झालेला खर्च व उर्वरित कामाचा खर्च याचा अंदाज घेवून शासन नव्याने निविदा प्रक्रिया काढण्याचा विचार चालू आहे. इंदापूर ते झाराप हा मार्ग काँक्रीटचा होणार असून ती शासन स्वत: करेल असे आमदार भरत गोगावले याप्रसंगी म्हणाले.
तालुका प्रमुख अमित उकडे यांनी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष पराग फुकणे यांनी आमदार भरत गोगावले यांना पत्रकार संरक्षण कायदा अमलात आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कोकण रेल्वे दुपदरीकरण आदी सुविधा लवकर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Let's oppose the factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.