शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

झंडा उँचा रहे हमारा, कोरोना काळात काम करणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 01:13 IST

अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे स्वातंत्र्य दिनाच्या ७३व्या वर्धापन दिनी मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

रायगड : समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकारमार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने येणाºया काळात जिल्हा अधिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करताना दिसेल, असे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शनिवारी येथे केले. अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे स्वातंत्र्य दिनाच्या ७३व्या वर्धापन दिनी मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर, पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या ७३व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी व करोना या संकटात दुर्दैवाने मृत्यू झालेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यंदाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यावर करोनाचे सावट आहे. गेले पाच महिने आपण सगळेच या विषाणूशी सर्व साधनसामुग्रीसह एकवटून लढतोय, त्यात यशस्वी ही होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपले राज्य विविध आघाड्यांवर मार्गक्रमण करीत आहेत. समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, उद्योजक या सर्व घटकांच्या विकासासाठी सरकीर कटिबद्ध असल्याचा पुनरुउच्चार त्यांनी केला.कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले होते. ओएनजीसी, उरण, एमआयडीसी असोसिएशन, महाड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, महाड, रोहा इंडस्ट्रिज असोसिएशन, रोहा, स्वदेश फाउंडेशन, रिलायन्स यांसारख्या उद्योग समूहांनी मदतीचा हात पुढे केला. त्याबाबत पालकमंत्री तटकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.सध्या जिल्ह्यात ९८ शिवभोजन केंद्रांना १७ हजार ३०० शिवभोजन थाळी मंजूर आहे. या शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून दररोज जवळपास १६ हजार गरजूंना जेवण मिळत आहे. याशिवाय कम्युनिटी किचनसारख्या उपाययोजनांमधून गरजूंना जेवण देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आल्याकडे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी लक्ष वेधले. कोरोनापाठोपाठ जिल्ह्यावर निसर्ग चक्रीवादळाचे संकट आले. या संकटात सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या माध्यमातून एनडीआरएफ, भारतीय तटरक्षक दल, रायगड जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलातील सदस्य संस्था, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक, पोलीस विभाग, महसूल विभागाच्या मदतीने जिल्ह्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन प्रसंगी सर्व विभागांशी समन्वय साधल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी टाळण्यास यश आले, याबद्दल तटकरे यांनी विविध सरकारी यंत्रणांच्या योग्य समन्वयामुळे हे शक्य झाले, असे सांगत त्यांचे कौतुक केले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.>समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध>सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यताअलिबाग येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० रुग्ण खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरू करण्याबाबत मान्यता दिली आहे. याशिवाय लवकरच मांडवा ते गेट वे आॅफ इंडिया या सागरी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर मोबाइल मेडिकल युनिटसह बोट अ‍ॅम्बुलन्स सेवा बाह्य यंत्रणेकडून कार्यान्वित होणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.पर्यटन विकासाला नवीन आयाम प्राप्त होणारकोकणातील पर्यटन वाढीसाठी सरकारने बीच शॅकस पॉलिसी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिकांना पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होणार आहे. रेवस ते रेडी सागरी महामार्गाच्या कामासाठी शासनाने ४ हजार ५०० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. रेवस, करंजा, अलिबाग, नांदगाव, मुरुड, दिघी, दिवेआगर, शेखाडीमार्गे रेडी या भागातून हा सागरी महामार्ग जाणार आहे. यामुळे पर्यटन विकासाला नवीन आयाम प्राप्त होणार आहे.