शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

रोह्यात बिबट्याचा हल्ला

By admin | Updated: March 23, 2017 01:40 IST

तालुक्यातील जंगल भागात सतत पेटत असणारे वणवे व कडक उन्हाळ्याची झळ पोहचत असल्याने जंगलातील हिंसक प्राणी

रोहा : तालुक्यातील जंगल भागात सतत पेटत असणारे वणवे व कडक उन्हाळ्याची झळ पोहचत असल्याने जंगलातील हिंसक प्राणी व अन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावातील वस्तीलगत असणारे नाले, कालवा, छोट्या नदीवर येत असल्याचे प्रकार सर्वत्र दिसून येत आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बकऱ्यांचा कळप घेऊन परतणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मालकीच्या कळपावर हिंसक बिबट्याने अचानक हल्ला करत धुमाकूळ घातला. या हल्ल्यामुळे साऱ्यांची तारांबळ उडाली. या हल्ल्यात बिबट्याने १७ शेळ्यांसह चार बोकडांचा फडशा पाडला. तेथे असणारे शेतकरी व ग्रामस्थ नजीकच्या झाडावर चढल्याने सुदैवाने बिबट्याच्या हल्ल्यातून ते बचावले. या घटनेमुळे तालुक्यातील संभे कोलाड गाव व परिसरात घबराटीचे वातावरण पसले आहे.रोहा-कोलाड मार्गावरील संभे गावातील शेतकरी सुरेश सुर्वे हे ६५ शेळ्यांच्या कळपासह जंगलात गेले होते. दिवसभर शेळ्या चरल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घरी परतीच्या मार्गावर असताना जंगलातील बिबट्याने शेळ्यांच्या कळपावर भयानक हल्ला चढवत धुमाकूळ घातला. यामध्ये जवळपास १७ शेळ्यांसह ४ बोकडांचा समावेश असून त्यामध्ये १३ शेळ्या व चार बोकड मृत अवस्थेत घटनास्थळी सापडले. चार शेळ्या अद्याप बेपत्ता असल्याची माहिती कोलाड वनविभागाने दिली आहे. बिबट्यांकडून हिंसक हल्ला होत असताना शेतकरी मालक सुरेश सुर्वे, त्यांचे सहकारी महेंद्र जाधव, संजय वाघमारे यांनी जवळच्या झाडाचा आधार घेतला तर कळपातील उर्वरित शेळ्यांनी धाव घेत आपले खुराडे गाठले. सुदैवाने शेतकरी व त्यांचे दोन सहकारी बचावले. (वार्ताहर)