प्रयत्न आणि जिद्दीने के ली शेती

By Admin | Updated: April 17, 2017 04:36 IST2017-04-17T04:36:17+5:302017-04-17T04:36:17+5:30

नोकरीसाठी सोलापूरहून कर्जत तालुक्यात आलेल्या प्रगत शेतकऱ्याने स्थानिक होतकरू तरुणाला सोबत घेऊन शेतीतील वेगवेगळे प्रयोग केले आहे

Leftover efforts and stubbornness | प्रयत्न आणि जिद्दीने के ली शेती

प्रयत्न आणि जिद्दीने के ली शेती

संजय गायकवाड, कर्जत
नोकरीसाठी सोलापूरहून कर्जत तालुक्यात आलेल्या प्रगत शेतकऱ्याने स्थानिक होतकरू तरुणाला सोबत घेऊन शेतीतील वेगवेगळे प्रयोग केले आहेत. भुईमूग आणि कांदा या पिकांची शेती आता फुलली असून, कडधान्य शेतीदेखील या दोन्ही शेतकऱ्यांनी यशस्वी करून अल्पभूधारक शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे.
सोलापूर येथील हिंदूराव जाधव हे मुंबईमधील बेस्ट या परिवहन विभागात काम करीत असल्याने ते कर्जत तालुक्यात राहतात. नोकरीमुळे त्यांना आपला आवडता छंद जोपासता आला नाही. मात्र, डिकसळ येथील वैभव तुपे हे अल्पभूधारक असतानाही त्यांना सातत्याने प्रयोगशील शेती करण्याची आवड आहे. तुपे हे सातत्याने परिसरातील शेतकरी यांनी केलेली शेती यांची माहिती घेण्यासाठी ते फिरत असतात. जाधव यांची मागील दोन वर्षांपूर्वी तुपे यांच्याशी ओळख झाली. या दोघांनी डिकसळ येथील भातशेती शिवाय वेगळी शेती करण्याचा निर्णय घेतला. हिवाळ्यात वाल, हरभरा, मटकी आणि तूर या पिकाची शेती करताना त्यांनी आपल्या कुटुंबीयांना वर्षभर बनविता येईल, अशी कडधान्य साठवणूक करून ठेवता आली आहे. त्याच वेळी प्रामुख्याने घाट माथ्यावर केली जाणारी भुईमूग शेती करण्याचा निर्णय जाधव आणि तुपे या दोन प्रयोगशील शेतकऱ्यांनी घेतला. त्यासाठी भुईमूग शेतीला लागणाऱ्या भरपूर पाण्याची अडचण डिकसळ ग्रामस्थांनी पूर्ण केली. ग्रामस्थ पाणी वापरत नसलेली विहीर त्यांनी या दोन शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी वापरण्यास दिली. भुईमूग शेती करण्यासाठी त्यांनी एक एकर जमिनीमध्ये वाफे तयार करून भुईमुगाचे वाण सोलापूर येथून आणले. २२ जानेवारी रोजी लावलेली भुईमुगाची शेती पूर्णपणे बहरली असून महिन्याभरात हे पीक जमिनीमधून काढले जाणार आहे. भुईमुगाशिवाय या दोघा शेतकऱ्यांनी कांदा पीक घेण्याचा प्रयत्न केला आहे.
भुईमुगाच्या वाढलेल्या झाडाला जमिनीत लागलेल्या शेंगा लक्षात घेता मे २०१७ रोजी आम्हाला ८०० किलो शेंगा मिळतील, असा विश्वास त्यांना आहे. तसेच शेतातील कांद्याचे पीक चांगले असल्याचे समाधान व्यक्त के ले. या दोन्ही प्रकारची शेती करण्यासाठी हिंदूराव जाधव आणि वैभव तुपे यांना ११ हजार खर्च हा बियाणे, खते, कीटकनाशक, डिझेल पंप यांच्यासाठी आला आहे. त्याचवेळी या दोघांनी आपल्या शेतात ज्वारी, बाजरी, भाजीपाला पिके केली असून आपल्या शेतीतील यशस्वी प्रयत्नाबद्दल ते दोघे समाधानी आहेत. परिसरातील प्रयोगशील शेती पाहण्यासाठी शेतकरी भेट देत असून त्यांना सर्व प्रकारची माहिती देण्याचे काम वैभव तुपे करीत आहेत.

Web Title: Leftover efforts and stubbornness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.