शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

माथेरान रेल्वे दुरु स्तीचे काम अंतिम टप्प्यात!, मिनीट्रेन लवकरच येणार रु ळावर, स्थानिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:53 IST

माथेरान मिनीट्रेन रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच मिनीट्रेन स्थानिकांसह पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. माथेरानला १९०७ साली मिनीट्रेन सेवा सर आदमजी पिरभॉय या पितापुत्रांनी सुरू करून रेल्वे प्रशासनाला जनतेच्या सेवेसाठी बहाल केली. या ठिकाणी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मिनीट्रेनमुळे पर्यटन वाढल्याने स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाले आहेत; परंतु गतवर्षी तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा बंद करण्यात आली होती.

- मुकुंद रांजणे  माथेरान : माथेरान मिनीट्रेन रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच मिनीट्रेन स्थानिकांसह पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.माथेरानला १९०७ साली मिनीट्रेन सेवा सर आदमजी पिरभॉय या पितापुत्रांनी सुरू करून रेल्वे प्रशासनाला जनतेच्या सेवेसाठी बहाल केली. या ठिकाणी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मिनीट्रेनमुळे पर्यटन वाढल्याने स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाले आहेत; परंतु गतवर्षी तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. ही सेवा पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी विद्यमान नगरसेवक प्रसाद सावंत, शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी रेल्वेमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तर माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर यांनीसुद्धा प्रत्यक्ष रेल्वेमंत्र्यांच्या भेटी घेऊन निवेदन दिले होते. एक सदस्य समितीचे जनार्दन पार्टे यांसह स्थानिक पातळीवर कामे करणाºया विविध संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनीसुद्धा लेखी निवेदन संबंधित अधिकारी वर्गाला दिलेली आहेत. त्यानुसार रेल्वेचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे.आॅक्टोबर महिन्यात ही रेल्वे सेवा सुरळीत सुरू होईल, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे. माथेरानची राणी लवकरच पुन्हा रु ळावर येणार असल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.खासदार बारणे यांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा१माथेरानच्या मिनीट्रेनला बंद होऊन वर्षपूर्ती झाली असून, त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे. ही सेवा पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नवनियुक्त केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची बुधवार, ६ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे भेट घेऊन नेरळ-माथेरान ही नरॉगेज ट्रेन लवकरच सुरू करावी, अशी मागणी केली.२माथेरानच्या मिनीट्रेनची बोगी ८ मे २०१६ रोजी एका जागीच दोनदा घसरल्याने रेल्वेच्या अधिकाºयांनी ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आगामी सुट्ट्यांचा हंगाम जवळ येत असल्याने नेरळ-माथेरान ट्रेन लवकरात लवकर सुरू करून पर्यटकांच्या सेवेसाठी तत्परता दर्शवावी, असेही बारणे यांनी नवनियुक्त केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे स्पष्ट केले.मिनीट्रेन ही माथेरानकरांसह पर्यटकांचा श्वास बनलेली आहे. याबाबत वारंवार सरकार दरबारी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह भेटी घेतलेल्या आहेत. एकंदरच रेल्वेच्या दुरु स्तीची कामे युद्धपातळींवर सुरू असल्याने अल्पावधीतच ही सेवा सुरू होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.- प्रसाद सावंत, विद्यमान नगरसेवक माथेरान नगरपालिकाट्रेन बंद असल्यामुळे दस्तुरीपासूनची तीन किलोमीटर पायपीट करून केवळ माथेरानला यावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्यात यावी.- नीलकंठ मंडलिक, पर्यटक, मुंबई 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे