ऐनाचीवाडी शाळेचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान
By Admin | Updated: May 13, 2016 02:35 IST2016-05-13T02:35:19+5:302016-05-13T02:35:19+5:30
सोसाट्याचा वारा आणि जोरदार झालेल्या उन्हाळी पावसामुळे कर्जत तालुक्याला मोठा तडाखा बसला असून नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली

ऐनाचीवाडी शाळेचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान
नेरळ : सोसाट्याचा वारा आणि जोरदार झालेल्या उन्हाळी पावसामुळे कर्जत तालुक्याला मोठा तडाखा बसला असून नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने पाच तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. तसेच ऐनाचीवाडी शाळेचे पत्रे उडून शाळेचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने या शाळेत विद्यार्थी व शिक्षक नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु शाळेचे पत्रे उडाल्याने शाळेचे प्रचंड नुकसान झाले आहे.
कर्जत तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायत हद्दीत ऐनाचीवाडी येथे भीमादी विद्यालय असून येथे आठवी ते दहावीपर्यंत सुमारे १७० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. शाळेला सुटी लागल्याने शाळेत कोणी नव्हते त्यामुळे या वादळी वाऱ्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यात शाळेचे पत्रे व पाइप उडाल्याने शाळेचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामा करण्यात आला आहे परंतु पंचायत समितीच्या एकाही अधिकाऱ्याने या शाळेला भेट दिली नसल्याचे ग्रामस्थ सांगण्यात आले. १५ जूनच्या दरम्यान शाळा भरणार आल्याने शाळेची अवस्था अशीच राहिली तर विद्यार्थ्यांना बसण्यास मोठा अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे शाळेची लवकर दुरु स्ती करावी अशी मागणी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांकडून केली जात आहे. तसेच या वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक खड्डेमय रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे अशा रस्त्यांचीही दुरु स्ती करावी अशी मागणी कर्जत तालुक्यातील नागरिकांमधून केली जात आहे. (वार्ताहर)