शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

जंजिरा किल्ल्याच्या सुरक्षिततेत मोठ्या प्रमाणात केली वाढ, ‘लोकमत’ ने प्रसिद्ध केलेल्या बातमीने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 07:38 IST

Janjira fort : किल्ल्यास संरक्षण नसल्याने आणि येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही तपासणी होत नसल्याने मुक्त संचार होता. त्यामुळे अतिरेकी येथील पर्यटकांना ओलीस ठेवून देशविघातक कृत्ये करू शकतात, असा पोलीस यंत्रणेचा गुप्त अहवाल असल्याचे सांगण्यात आले होते.

आगरदांडा : ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा जगात प्रसिद्ध असून, हा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातील शेकडो पर्यटक मोठ्या प्रमाणात किल्ला पाहण्यासाठी येत असतात. परंतु या किल्ल्यास कोणतीही सुरक्षा नव्हती. या किल्ल्यावर पोलीस संरक्षण नव्हते. त्यामुळे सर्वांना मुक्त संचार होता. याबद्दल नुकतेच ‘लोकमत’मध्ये सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत या किल्ल्यास संरक्षण देण्यात आले आहे.किल्ल्यास संरक्षण नसल्याने आणि येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही तपासणी होत नसल्याने मुक्त संचार होता. त्यामुळे अतिरेकी येथील पर्यटकांना ओलीस ठेवून देशविघातक कृत्ये करू शकतात, असा पोलीस यंत्रणेचा गुप्त अहवाल असल्याचे सांगण्यात आले होते.  या बातमीची दखल पोलीस यंत्रणेकडून घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. सशस्त्र पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. कधीही पोलिसांचा वावर नसणारा किल्ला आता पोलिसांच्या संरक्षणामुळे गजबजून गेला आहे.जंजिरा किल्ला बघण्यासाठी शनिवारी -रविवारी  देशविदेशातील दहा हजारांपेक्षा जास्त पर्यटक येत  असतात. नेहमी गर्दी असणारा हा किल्ला आहे. त्यामुळे संरक्षणासाठी सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलाचे जवान व स्थानिक पोलिसांकडून या ठिकाणी गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. येणाऱ्या पर्यटकांना कोणताही धोका पोहोचू नये, सर्व पर्यटक भयमुक्त राहावेत, यासाठी पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे.  

येणाऱ्या - जाणाऱ्यांची कसून तपासणीकिल्ला जेट्टीजवळ रोजच पोलीस बंदोबस्त असतो. पर्यटकांची कसून तपासणीही केली जाते. सध्या किल्ल्यात एक रायफलधारी पोलीस व महिला पोलीस, होमगार्ड असा बंदोबस्त असतो. राजपुरी जेट्टीजवळ एक पोलीस व महिला पोलीस, खोराबंदर एक पोलीस असा बंदोबस्त रोजच असतो, तसेच शनिवारी व रविवारच्या वेळी पर्यटकांची संख्या जास्त असते, त्याचा अंदाज घेऊन पोलीस बंदोबस्तात वाढही केली जाते, तरी येणाऱ्या पर्यटकांनी तपासणी वेळेत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी केले. तसेच कुठेही संशयित व्यक्ती किंवा संशयित वस्तू दिसल्यास बोट मालक-चालक व स्थानिक नागरिकांनी त्वरित पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहनही केले.

टॅग्स :Raigadरायगड