शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मोठी दुर्घटना! रायगडमध्ये भूस्खलन, १०० जण अडकले; NDRF पथके अन् मंत्रीही पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 09:08 IST

Raigad Irshalwadi Landslide Incident - मध्यरात्रीच घटना घडल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.  

रायगड - जिल्ह्यातील खालापूर तहसील क्षेत्रातील इर्शाळवाडी गावात भूस्खलन झाल्याची माहिती आहे. एनडीआरएफची दोन पथके मदतकार्यासाठी रवाना झाली आहेत. गावातील या भूसख्खलनात १०० हून अधिकजण मलब्याखाली आल्याची शक्यता वर्तवण्यात आहे. एनडीआरएफच्या जवानांनी आत्तापर्यंत २२ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. दरम्यान, दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची आत्तापर्यंत माहिती हाती आली आहे. 

या भूस्खलन दुर्घटनेत चार जण मृत्यूमुखी पडले आहेत. गावची लोकसंख्या २३४ असून १०० जण अडकल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. पाऊस सुरू असल्याने मदत मिळण्यास अडचण येत आहे. अडीच किलोमीटर वर ही वाडी आहे. शासनाने हेलिकॉप्टर ने शोध करावे अशी मागणी ग्रामस्थांची आहे. एनडीआरएफ, पोलीस अधिकाऱ्यांसह जवळपास १०० जणांची टीम घटनास्थळी दाखल असून मदत व बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, मुंबईहूनही एनडीआरएफच्या आणखी दोन टीम घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. मध्यरात्रीच घटना घडल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.  

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू आहे. त्यातच मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, एनडीआरएफ जवानांशी संवादही साधला. 

टॅग्स :Raigadरायगडlandslidesभूस्खलनRainपाऊसRaigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण