पाणीटंचाईविरोधात ग्रामस्थ आक्रमक; खारपाले, देवळी, आमटेक ग्रामस्थांची पंपहाउसवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:54 IST2018-04-20T00:54:51+5:302018-04-20T00:54:51+5:30
उन्हाचा पारा चढत असतानाच देवळी, खारपाले भागातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. खारपाले, देवळी, आमटेम आदी गावांना जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पाणीटंचाईविरोधात ग्रामस्थ आक्रमक; खारपाले, देवळी, आमटेक ग्रामस्थांची पंपहाउसवर धडक
वडखळ : उन्हाचा पारा चढत असतानाच देवळी, खारपाले भागातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. खारपाले, देवळी, आमटेम आदी गावांना जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागला व आता पाणीपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.
परिसरातील पाणीटंचाई दूर व्हावी, म्हणून खारपाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किरण तुरे यांनी जेएसडब्ल्यूच्या पाटणसई येथील पंपहाउसवर धडक दिली. या वेळी देवळी गाव अध्यक्ष धावजी तुरे किरण शिंदे, यशवंत ठाकूर, सुधाकर तुरे, सखाराम केणी, कमळाकर शिवकर आदी ग्रामस्थ उपस्थितीत होते. ग्रामस्थानी पंपहाउसवर धडक दिल्याचे कळताच जेएसडब्ल्यू कंपनीचे जनसंर्पक अधिकारी अरुण शिर्के यांनी या ठिकाणी भेट देऊन सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल व पाणी सोडण्याची वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचे सांगितले.