शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

खालापूर तालुका आरोग्य केंद्रात सर्पदंश लसीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 4:13 AM

मोहोपाडा : खालापूर तालुक्यात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून आरोग्य केंद्रात सर्पदंशाच्या उपचारासाठी लसच उपलब्ध नाही. त्यामुळे चंद्रकांत बबन ...

मोहोपाडा : खालापूर तालुक्यात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून आरोग्य केंद्रात सर्पदंशाच्या उपचारासाठी लसच उपलब्ध नाही. त्यामुळे चंद्रकांत बबन पवार (१८, रा. खालापूर) याला चौक ग्रामीण रूग्णालयात हलविण्याची वेळ आली. खालापूर आरोग्य केंद्राची रूग्णवाहिकाही पंक्चर असल्याने अखेर दुचाकीवरून चंद्रकांतला चौक येथे नेण्याची वेळ आले.खालापूर येथील चंद्रकांत पवार याच्या पायाला मंगळवारी सकाळी हिरवा घोणस हा विषारी साप चावला. चंद्रकांतला तातडीने खालापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु आरोग्य केंद्रात सर्पदंश प्रतिबंधक लसच उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी टीटीचे इंजेक्शन देत पुढील उपचारासाठी दहा किमीवर चौक ग्रामीण रूग्णालयात जाण्यास सांगितले. यावेळी रूग्णवाहिकेची मागणी केल्यावर रूग्णवाहिकेचा टायर पंक्चर असल्याचे सांगण्यात आले. टायर बदलण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा जीव वाचविण्यासाठी चंद्रकांतला दुचाकीवरून चौक येथे नेण्यात आले.तालुक्यातील बहुतांश लोकवस्ती ग्रामीण, दुर्गम भागात असून पावसाळ्यात सर्पदंश, विंचूदंश सारख्या घटनांमध्ये वाढ होते. आरोग्य केंद्रात सर्पदंश प्रतिबंध लस नसल्याने नागरिक संतप्त असून रुग्णालयाचा गलथान कारभार न सुधारल्यास मोर्चा काढणार असल्याचे खालापूरचे कैलास पवार यांनी सांगितले.खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश प्रतिबंधक लस (एएसव्ही)नसल्याने टीटी इंजेक्शन देवून चौक येथे रूग्णाला नेण्यास सांगातले. रूग्णवाहिका पंक्चर असल्याने एकशे आठला कॉल केला होता, परंतु तोपर्यंत रूग्णाला दुचाकीवरून नेले.- ङॉ.अनिलकुमार शाह, वैद्यकीय अधिकारी, खालापूर आरोग्य केंद्र

टॅग्स :Healthआरोग्य