पूर्ववैमनस्यातून खोपोलीत शिवीगाळ

By Admin | Updated: February 9, 2016 02:24 IST2016-02-09T02:24:34+5:302016-02-09T02:24:34+5:30

मागील शिवजयंतीतील पोलिसांत केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून शिळफाटा येथील अय्याज शेख याने खालच्या खोपोलीतील सुहास वझरकर व त्याच्या पत्नीस शिवीगाळ केल्याची

Lack of prejudice | पूर्ववैमनस्यातून खोपोलीत शिवीगाळ

पूर्ववैमनस्यातून खोपोलीत शिवीगाळ

वावोशी : मागील शिवजयंतीतील पोलिसांत केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून शिळफाटा येथील अय्याज शेख याने खालच्या खोपोलीतील सुहास वझरकर व त्याच्या पत्नीस शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.
सुहास वझरकर व त्याची पत्नी शिळफाटा येथील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले असता अय्याज याने मागील घटनेचा राग मनात धरून सुहास व त्याच्या पत्नीस शिवीगाळ केली. सुहासने याबाबत खोपोली पोलिसात अय्याज विरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षी १९ फेब्रुवारीला शिवसैनिकांतर्फे शिवजयंती खालच्या खोपोलीत साजरी करण्यात आली होती. विविध कार्यक्रमानिमित्त रस्त्यावर काही भाग बांबूने अडविण्यात आले होते. त्यावेळी अय्याज शेख हा त्या ठिकाणी येवून बांबू काढून टाका असे सांगत दमबाजी करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा सुहास वझरकर यानेच त्यावेळी तक्रार दिली होती. याबाबत अय्याजला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून अय्याज शेख याने सोमवारी रात्री सुहास वझरकर यांना शिवीगाळ केल्याचे सांगितले.

शिवसैनिकांची मागणी
गेल्या वर्षी शिवजयंतीच्या वेळी अय्याज शेख आणि सुहास वझरकर यांच्या वाद झाला होता. वझरकर हे शिवसैनिक असून मागील घटनेबाबत राग मनात धरून अशा प्रकार करत असतील तर पोलिसांनी अशा व्यक्तीविरोधात कडक कारवाई करावी अशी शिवसैनिकांची मागणी आहे.

Web Title: Lack of prejudice