‘कुंडलिका संवर्धन’ ई-भूमिपूजन

By Admin | Updated: April 14, 2017 03:09 IST2017-04-14T03:09:19+5:302017-04-14T03:09:19+5:30

राज्यातील शहरांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अमृत व नगरोत्थान अभियानअंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. राज्यातील २८ शहरांमध्ये

'Kundalika culture' e-Bhumi Pujan | ‘कुंडलिका संवर्धन’ ई-भूमिपूजन

‘कुंडलिका संवर्धन’ ई-भूमिपूजन

रोहा : राज्यातील शहरांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अमृत व नगरोत्थान अभियानअंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. राज्यातील २८ शहरांमध्ये १६.२२ कोटी रुपये खर्चून राज्यातील शहरे स्मार्ट बनविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोह्याचे सुपुत्र प.पु. पांडुरंगशास्त्री आठवले आणि डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या जन्मभूमीसाठी ३३ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले असून या निधीतून ६.३० कोटी रुपये खर्च करून कुंडलिका नदीचे सुशोभीकरण आणि २८.८१ कोटी रुपये भुयारी गटार योजनेसाठी देत रोह्यावर कृपादृष्टी केली आहे.
या प्रकल्पांसाठी रोहा शहराचे विद्यमान आ.अवधूत तटकरे यांनी त्यांच्या नगराध्यक्षपदांच्या कार्यकाळात केंद्रात व राज्यात पाठपुरावा केला होता. आ.अवधूत तटकरे यांच्या प्रयत्नांना यश आल्याबद्दल रोहेकर नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. या ई-भूमिपूजनाच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी रोहा नगरपरिषदेने डॉ.सी.डी. देशमुख शहर सभागृहात कार्यक्र माचे आयोजन केले होते. मात्र रोहेकर नागरिकांनी या कार्यक्र माकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्यासह नगरसेवक, नगरपालिकेतील कर्मचारी व पत्रकार वगळता या कार्यक्र माला स्थानिक उपस्थित नव्हते.(वार्ताहर)

Web Title: 'Kundalika culture' e-Bhumi Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.