शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

कुडकी, कोंढेपंचतन धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 03:44 IST

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन परिसरामध्ये गेले तीन दिवस पाऊस तुफान बरसत आहे. परिसरातील कोंढेपंचतन व कुडकी धरण ओव्हरफ्लो झाले आहे, तर कार्लेपंचतन धरण ५० टक्के भरले आहे.

बोर्ली पंचतन - श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन परिसरामध्ये गेले तीन दिवस पाऊस तुफान बरसत आहे. परिसरातील कोंढेपंचतन व कुडकी धरण ओव्हरफ्लो झाले आहे, तर कार्लेपंचतन धरण ५० टक्के भरले आहे. कोंढेपंचतन धरणावर मौजमजा करण्यासाठी परिसरातील तरु णवर्गाची गर्दी होत असली तर तेथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून दिघी सागरी पोलीस ठाण्याचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.भात शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने लावणीची कामे ठप्प पडली आहेत, त्यामुळे शेतकरी पाऊस कमी होण्याची वाट पाहत आहे. बोर्ली पंचतन परिसरास पावसाने चांगलेच झोडपून काढले असून, सर्व परिसर जलमय झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर तसेच दिघी-मोर्बा- माणगाव मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने प्रवास करणे धोकादायक झाले आहे. तर मोर्बा गावाजवळ नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने मार्ग बंद ठेवून ही वाहतूक लोणारे-गोरेगाव मार्गे वळविण्यात आली होती, त्यामुळे लांब पल्ल्याच्या एसटी बसेस उशिराने धावत आहेत.पाऊस जोरदार पडत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ होत असून दिवेआगर, बोर्ली पंचतन, भरडखोल, कार्ले गावाच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असणाऱ्या कोंढेपंचतन लघु पाटबंधारे धरण ५० टक्के भरले आहे. या धरणाचे वैशिष्ट्य की धरण मोठे असून, या धरणास पाणी संचय होण्यासाठी जलस्रोत अतिशय कमी असल्याने १९६४च्या उभारणीनंतर हे धरण एकदाही १०० टक्के भरले नाही. तर वडवली गावाजवळील कुडकी म्हसळा तालुक्यातील पाभरा, संदेरी लघु पाटबंधारे धरण पूर्णत: भरले असून, त्यातून पाण्याचा काही प्रमाणात विसर्ग होत आहे. तर श्रीवर्धन शहरासह आराठी, जसवली, गालसुरे आदी गावांना पाणीपुरवठा करणारे धरणही सुमारे ५० टक्के भरले आहे.बोर्ली पंचतन गावास सहा महिने पाणीपुरवठा करणारे व बोर्ली पंचतनपासून पूर्वेला दोन कि.मी. डोंगरात असलेले कोंढेपंचतन धरण पूर्ण भरून वाहू लागल्याने तिथे सहलीसाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. रविवार असल्याने या ठिकाणी गर्दी होणार होती; परंतु जोराचा पाऊस पडल्याने धरणातून बाहेर पडणाºया पाण्याचा वेग जास्त असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भागामध्ये जाण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केल्याने तरु णवर्गाचा हिरमोड झाला तर कोंढेपंचतन धरण परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दिघी सागरी पोलीस ठाण्याची नजर आहे.

टॅग्स :Damधरणnewsबातम्या