शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणायचं जिगर... आपुलकीने मैत्री दिनी मित्राला दिले घर भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 02:47 IST

महेंद्र घरत यांनी जोपासले अनोखे नाते : वीस वर्षांपासून मुरलीधर ठाकू र यांची सोबत

पनवेल : आपल्या प्रगतीत आपले नातेवाईक, जीवलग मित्र यांचाही मोलाचा वाटा आहे. ही जाणीव बाळगणेही मोठेपणाचे लक्षण आहे. वीस वर्षांपूर्वी सोबतीला असलेला मित्र अद्यापही आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याने त्याच्यासाठी आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे, अशी आपुलकी जपत कामगार नेते महेंद्र घरत यांनी आपल्या मित्राला थेट घर भेट देऊन मैत्रीचा हा अनोखा अध्याय सुरू केला.

रविवारी मैत्री दिनाचे मुहूर्त साधत कामगार नेते महेंद्र घरत यांनी आपला मित्र मुरलीधर ठाकूर यांना हे घर भेट दिले. पनवेल शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या रॉयल रेसिडन्सी इमारतीत सुमारे १,२०० स्क्वेअर फुटाचे घर भेट देत, आपली मैत्री जपली आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या घराची किंमत कोटींच्या घरात आहे. २२ वर्षांपासून मुरलीधर हे घरत यांच्यासोबत आहेत. कामगार क्षेत्रात पदार्पण करतेवेळी ठाकूर यांच्याशी घरत यांची ओळख झाली, त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर, कामगार युनियनच्या बैठका, मोर्चे, अधिवेशन आदी सर्वच ठिकाणी ठाकूर हे घरत यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करीत असत. त्या मित्राची गरज ओळखून त्याला मी घर भेट दिले असल्याचे घरत यांनी सांगितले.समाजकारण, राजकारण करीत असताना, मी माझ्यासोबत असलेल्या प्रत्येकाला यामध्ये वाहन चालकापासून, कामगार असो, यांना माझ्या परीने मदत करीत असतो. नेहमीच माझ्यासोबत असलेल्या प्रत्येकाला मी मदत करत असतो. यामध्ये आर्थिक असो, अथवा कोणाला घर बांधून देणे असो, अशा स्वरूपाची मदत केली आहे. यामध्ये माझे सुरक्षारक्षक, वाहनचालक, शिपायांचाही समावेश आहे. आपल्यासोबत असलेल्या प्रत्येकाची जाणीव ठेऊन आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेने मी माझ्या परीने मदत करत असतो. यामध्ये मला आत्मिक समाधान मिळतो, तसेच अनेकांचे स्वप्न माझ्यामुळे पूर्ण होत असल्याने, याचाही मला आनंद होत असल्याचे घरत यांनी सांगितले.

कामगार क्षेत्रात कामगारांच्या हितासाठी झगडत असताना, त्यांना न्याय मिळावा, याकरिता मी राष्ट्रीय इंटकच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील असतो. माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक घटकाबाबत माझी आपुलकी असल्याने, या आपुलकीने मी सामाजिक कार्य करीत असतो. या भावनेने मी माझा मित्र मुरलीधर ठाकूर याला घर भेट दिले आहे. मुरलीधरसह माझ्यासोबत काम करणाºया अनेकांना मी विविध स्वरूपाची मदत केली आहे. 

टॅग्स :Friendship Dayफ्रेंडशिप डेHomeघर