खारपाडा टोलवसुली बंद

By Admin | Updated: August 28, 2015 23:23 IST2015-08-28T23:23:13+5:302015-08-28T23:23:13+5:30

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पाताळगंगा नदीवर १९९८-९९ साली बांधलेल्या खारपाडा ब्रिजची टोल आकारणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद झाली. या ब्रिजचा बांधकाम खर्च

Kharpada toll tax off | खारपाडा टोलवसुली बंद

खारपाडा टोलवसुली बंद

पेण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पाताळगंगा नदीवर १९९८-९९ साली बांधलेल्या खारपाडा ब्रिजची टोल आकारणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद झाली. या ब्रिजचा बांधकाम खर्च ३३ कोटी ३० लाख आयआरबी बिल्डर्स आणि जोईर व्हेंचर अमेय डेव्हलपर्स यांनी केला होता. ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या बीओटी तत्त्वावर गेली १५ वर्षे या ब्रिजच्या टोल आकारणीतून जून २०१५ पर्यंत १२१ कोटी १७ लाख ४० हजारांची टोलवसुली करण्यात आली आहे. जुलै व आॅगस्ट महिन्यांत टोल आकारणी वसुलीच्या रकमेचा समावेश केल्यास हा आकडा १२५ कोटींच्या घरात जाण्यात शक्यता आहे.
बांधकाम खर्चाच्या चौपटीपेक्षा जास्त रुपयांची झालेली करवसुली आयआरबीने केली आहे. टोलवसुलीची अंतिम तारीख संपण्यापूर्वीच आयआरबी बिल्डर्सने आपले सामान हलवाहलवी करण्यास सुरुवात केली आहे. या ब्रिजचे सर्व अधिकार एनएचआयचे प्रकल्प संचालक फेगडे व सहाय्यक प्रकल्प संचालक आगरखाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
खारपाडा टोलनाक्यावर खारपाडा गाव व परिसरातील अनेक कुटुंबे या ठिकाणी काकडी, टरबूज, कलिंगड व इतर फळांच्या काप करून प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये १० रुपये प्रति वाटा याप्रमाणे प्रवासी व वाहनचालकांना फळे विकून रोजीरोटी कमावित होते. नाक्यावर वाहने थांबणार नसल्याने याठिकाणचा फ्रूटसॅलेडचा धंदा बंद होणार आहे. गेली १५ वर्षे या ५० ते ६० कुटुंबांना या टोलनाक्याने चांगला रोजगार मिळत होता तो बंद होणार आहे त्यामुळे खारपाडा टोल बंद झाल्यावर या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांवर मोठा आघात होणार आहे. (वार्ताहर)

वर्षनिहाय टोलवसुली
वर्षवसुली (लाखांत)
१९९९ - २०००४१५.८१
२००० - २००१४१६.००
२००१ - २००२६७५.००
२००२ - २००३६८१.००
२००३ - २००४६३९.००
२००४ - २००५६८४.००
२००५ - २००६९६०.००
२००६ - २००७८६७.८०
२००७ - २००८७४९.३३
२००८ - २००९७०५.१५
२००९ - २०१०६७२.२२
२०१० - २०११७४१.५२
२०११ - २०१२७४८.४५
२०१२ - २०१३८५९.६५
२०१३ - २०१४८२२.३०
२०१४ - २०१५८५३.१२
२०१५ - २०१६२२७.४०
एकूण१२१,१७.८१

बीओटी तत्त्वावर गेली १५ वर्षे या ब्रिजच्या टोल आकारणीतून जून २०१५ पर्यंत १२१ कोटी १७ लाख ४० हजारांची टोलवसुली करण्यात आली आहे.

स्थानिकांचा रोजगार बंद : खारपाडा टोलनाक्यावर काम करणाऱ्या ५० ते ६० स्थानिक रोजंदारी कामगारांची रोजीरोटी बंद होणार आहे. या कामगारांनी गेली पंधरा वर्षे आयआरबी बिल्डर्स कंपनीचा वसुलीचा आर्थिक व्यवहार सांभाळला. त्यांच्या पंधरा वर्षांच्या श्रमाचा प्रश्न व सर्व्हिस रकमेबाबत पेणचे आ. धैर्यशील पाटील यांनी ठेकेदार कंपनी व्यवस्थापनाशी सामंजस्य तडजोड करून निकाली काढला आहे.

Web Title: Kharpada toll tax off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.