खालापुरात किरकोळ वादातून मारहाण

By Admin | Updated: March 10, 2017 03:43 IST2017-03-10T03:43:09+5:302017-03-10T03:43:09+5:30

कंपाऊंड बांधण्याचा वाद विकोपाला जाऊन मारहाण झाल्याची घटना कलोते येथे घडली असून, खालापूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्र ार दाखल करण्यात आली आहे.

Khalapur minor dispute | खालापुरात किरकोळ वादातून मारहाण

खालापुरात किरकोळ वादातून मारहाण

वावोशी : कंपाऊंड बांधण्याचा वाद विकोपाला जाऊन मारहाण झाल्याची घटना कलोते येथे घडली असून, खालापूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्र ार दाखल करण्यात आली आहे.
कलोते गावातील श्रीकांत जाधव यांनी खालापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्र ारीनुसार, गावातच राहणारा नीतेश पाटील यांनी जाधव यांच्या कारला टाटा मॅजिक रिक्षाची धडक दिली. त्या वेळी झालेल्या भांडणात नीतेश पाटील, योगेश पाटील, रोशन पाटील व अन्य सहाजणांनी श्रीकांत जाधव व त्याचा भाऊ संदीप जाधव याला मारहाण केली. जखमी संदीप आणि श्रीकांत जाधव यांना खोपोली येथील जाखोटीया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर नीतेशची आई तारामती पाटील यांच्या तक्रारीनुसार कंपाऊंडच्या वादातून श्रीकांत व त्याचा भाऊ संदीप जाधव याने सात ते आठ गुंडांना सोबत घेऊन नीतेशला मारहाण करून जखमी केले. खालापूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्र ार दाखल झाली आहे.

Web Title: Khalapur minor dispute