शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

केवनाळेची धावपटू साक्षी दाभेकरची उपेक्षा; मदतीपासून वंचित, दरड दुर्घटनेत बालकाला वाचवताना गमावला पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 11:59 AM

Sakshi Dabhekar : पोलादपूर तालुक्यातील सावित्री खोऱ्यातील केवनाळे गावात गेल्या आठवड्यात   अस्मानी संकटात एका बालकाला वाचवताना आपला पाय गमावलेल्या साक्षी दाभेकर शाळकरी मुलीची उपेक्षा होत आहे.

पोलादपूर : तालुक्यातील सावित्री खोऱ्यातील केवनाळे गावात गेल्या आठवड्यात   अस्मानी संकटात एका बालकाला वाचवताना आपला पाय गमावलेल्या साक्षी दाभेकर शाळकरी मुलीची उपेक्षा होत आहे. उत्तम धावपटू होण्याचे स्वप्न असलेल्या साक्षीला पुन्हा मैदानात उतरायचे आहे, पण त्यासाठी तिच्या जिद्दीला समाजातील दानशूरांच्या मदतीची गरज आहे.

तालुक्यातील सावित्री खोऱ्यातील केवनाळे गावातील गेणू दाभेकर आणि त्यांच्या शेजारच्या चार घरांवर दरड कोसळली होती. शेजारच्या घरातल्या नवजात बालकाचा टाहो तिने ऐकला आणि शाळेत प्रत्येकवेळी धावण्याच्या स्पर्धेत नेहमी पहिला क्रमांक पटकावणाऱ्या साक्षीने तिकडे धाव घेतली. एका उडीतच तिने शेजारचे उफाळेताईंचे घर गाठले आणि समोर दिसणाऱ्या बाळावर शरीराचे कवच केले. दररोज ती खेळवणाऱ्या निरागस हसऱ्या लहानग्याचा जीव वाचविण्यासाठी तिने स्वतःच्या जीवाची पर्वादेखील केली नाही. पुढच्याच मिनिटाला साक्षीनेसुद्धा जोरात किंकाळी फोडली. त्या घराची अर्धी भिंत तिच्या पायावर कोसळली होती. पावसाचे थैमान सुरूच होते. आजूबाजूचे आणखी काहीजण धावले तोपर्यंत लक्षात आले चार घरांवर दरड कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर साक्षी नारायण दाभेकरचा पाय उचलत नव्हता, रक्ताने तो पूर्ण माखला होता. साक्षीवर तातडीने मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.

आयुष्यात मोठे धावपटू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या साक्षीला या अपघातात आपला पाय गमवावा लागला आहे. सध्या तिच्यावर केईएम हॉस्पिटलच्या  नवीन बिल्डिंगमध्ये चौथा माळा, वॉर्ड नं २९ मध्ये ती उपचार घेत आहे. लोकप्रतिनिधींचा लवाजमा तिची विचारपूस करण्यासाठी येतो, मात्र तो रिक्त हाताने फोटो काढून सोशल मीडियावर टाकून फक्त सहानुभूतीचे काम संपते. सरकारी लालफितीच्या कारभारातून तिच्या कुटुंबाला तुटपुंजी मदत यापुढे मिळेलसुद्धा, पण त्याने भविष्याचा अंधार कसा मिटणार? हा प्रश्न तिच्यासमोर आहे.  

अपंगावस्थेतही मैदानात उतरण्याची जिद्द नियतीने साक्षीला एका पायाने अपंग केले असले तरी ती अभ्यासात प्रचंड हुशार आहे. तिच्याकडे असलेल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर भावी आयुष्यात उत्तुंग यश मिळवण्याचा तिचा निर्धार आहे. समाजातल्या दानशूरांनी आर्थिक मदतीचा एक तरी दिवा लावून तिच्यावर कोसळलेल्या संकटाचा अंधकार दूर करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. दानशुर व्यक्तींनी तिला प्रतीक्षा नारायण दाभेकर, बँक ऑफ इंडिया, पोलादपूर शाखा, खाते क्रमांक : १२०३१०५१०००२८३९, आएफसी कोड : बीकेआयडी०००१२०३ एमआयसीआर, या खात्यावर मदतीचे आवाहन या बँक खातेवर मदत करण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. 

टॅग्स :Raigadरायगड