विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी विकासाबरोबर राहावे
By Admin | Updated: January 7, 2016 00:50 IST2016-01-07T00:50:34+5:302016-01-07T00:50:34+5:30
कोकणातील प्रश्न तसेच येथील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या भागाचा विकास

विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी विकासाबरोबर राहावे
अलिबाग : कोकणातील प्रश्न तसेच येथील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या भागाचा विकास होण्यासाठी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी नेहमी विकासाबरोबर राहिले पाहिजे, अशी अपेक्षा आमदार पंडित पाटील यांनी बुधवारी येथे बोलताना व्यक्त केली आहे. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या ना.ना.पाटील सभागृहात आयोजित पत्रकार दिन कार्यक्र मात आ. पाटील अध्यक्षपदावरुन बोलत होते.
आ. पाटील पुढे म्हणाले, राज्याच्या उर्वरित भागापेक्षा कोकणातील शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत. हे प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधून कोकणाला न्याय मिळविणे आवश्यक आहे. पत्रकारांनी आपल्या भागाच्या विकासासाठी शासकीय निधी मिळाला पाहिजे यासाठी वस्तुनिष्ठ बातम्या देऊन आवाज उठविला पाहिजे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी असणारी उत्पन्न मर्यादा वाढविणे आवश्यक आहे. समाजाचे प्रश्न मांडत असताना पत्रकारांच्या स्वत:च्या अडचणी, प्रश्न दुर्लक्षित होतात. ते सोडविण्यासाठी पत्रकारांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार अभिजित राणे यांनी पत्रकार सामाजिक प्रश्नाला वाचा फोडत असताना त्यांचे मासिक वेतन तसेच इतर मूलभूत प्रश्न दुर्लक्षित केले जातात. हे प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकार संघांमार्फत एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. पत्रकारांचे प्रश्न सुटल्यास ते समाजाचे प्रश्न अधिक सक्षमपणे सोडवू शकतात असे प्रतिपादन केले.
या कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अभिजित राणे, ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत, पंचायत समितीचे उपसभापती अनिल गोमा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण
च्रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी राजा राजवाडे स्मृती पुरस्कार डॉ.पूर्वा प्रमोद अष्टपुत्रे (अंबरनाथ-ठाणे), कै.र.वा.दिघे पुरस्कार-सिध्दार्थ नवीन सोष्टे (नागोठणे), रायगड पत्रभूषण पुरस्कार दामोदर शहासने (कर्जत), स्व.म.ना.पाटील स्मृती पुरस्कार गुरु नाथ साठीलकर (खोपोली), रामनारायण युवा पत्रकार पुरस्कार-जितेंद्र जोशी (रोहा), संतोष चौकर (श्रीवर्धन), उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार जुगल दवे (रोहा) यांना प्रदान करण्यात आले.