सोमवारी मटण, मच्छी, चिकन विक्री बंद ठेवा; ग्रामपंचायतींचे व्यावसायिकांना आवाहन

By निखिल म्हात्रे | Published: January 21, 2024 01:08 PM2024-01-21T13:08:22+5:302024-01-21T13:09:54+5:30

मद्य विक्रीही बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे

Keep the sale of mutton, fish, chicken closed on Monday; Gram Panchayats appeal to professionals | सोमवारी मटण, मच्छी, चिकन विक्री बंद ठेवा; ग्रामपंचायतींचे व्यावसायिकांना आवाहन

सोमवारी मटण, मच्छी, चिकन विक्री बंद ठेवा; ग्रामपंचायतींचे व्यावसायिकांना आवाहन

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: अयोध्येत २२ जानेवारीला (सोमवारी) होणाऱ्या राममंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीनी मटन, चिकन आणि मच्छी विक्री बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. यात मद्य विक्रीही बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राममंदिर प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. विवीध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून, मंदिर आणि तिर्थक्षेत्रांची साफसफाई करून तिथे रोषणाई केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी २२ जानेवारीला मटन, चिकन, मच्छी विक्री बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. अलिबाग तालुक्यातील चौल, खानाव, नागाव ग्रामपंचायतींनी याबाबतचे पत्र जारी केले आहे. तर कर्जत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायतीनेही अशाच स्वरूपाची जाहीर नोटीस काढली आहे.

अशाच स्वरूपाची आवाहन पत्रके आता ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतींनी जारी केली आहेत. श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने, गावातील मांसाहारी हॉटेल्स, धाबे आणि चायनिजची दुकानेही बंद ठेवावीत असे आवाहनही या पत्रकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या येत्या सोमवारी मांसाहार करणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Web Title: Keep the sale of mutton, fish, chicken closed on Monday; Gram Panchayats appeal to professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग