शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

कशेडी घाट प्रवाशांसाठी धोकादायक; ६० ते ७० फूट रस्ता खचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 06:46 IST

महामार्ग बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; तहसीलदारांशी पत्रव्यवहार

दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूरपासून सुरू होणाऱ्या कशेडी घाटात पोलादपूरपासून ८ किमी अंतरावर एका अवघड चढणीवर दोन मोठे तडे गेले आहेत. मध्य भागातील ६० ते ७० फूट रस्त्याचा संपूर्ण भाग खचून गेला आहे. सध्या हा भाग कधीही कोसळून या ठिकाणी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर हद्दीत १२ किमीचा कशेडी घाट म्हणून संपूर्ण चढ लागतो.सध्याच्या परिस्थितीत वाहनांसाठी धोकादायक स्थिती बनली आहे. जवळच असलेल्या महामार्ग वाहतूक शाखा व कशेडी पोलिसांनी पोलादपूरच्या राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या तहसीलदारांना पत्रव्यवहार केला आहे. तसेच महाडचे प्रांताधिकारी व पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी यांना फोनद्वारे माहिती दिली आहे. ठिकठिकाणचे महामार्ग पडलेले खड्डे तर नवीन महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे होणाºया अडचणी अशा परिस्थितीत या मार्गावरून वाहनांनी प्रवास करणे कठीण बनले आहे.दरवर्षी या घाटामध्ये एक ते दोन ठिकाणी रस्ता साधारण खचण्याची घटना घडत असते. दरवर्षी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून मलमपट्टी लावत डागडुजी केली जाते. यंदा संपूर्ण कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलादपूरपासून ८ किमी अंतरावर मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाला कशेडी घाटात दोन मोठे तडे गेले आहेत आणि दोन तड्यांच्या जवळपास ६० ते ७० फुटांच्या मधल्या भागात महामार्गच खचला आहे.पावसामुळे यात तड्यांमध्ये पाणी झिरपून महामार्गाचा हा रस्ता कधीही खाली खोल दरीत कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून याच रस्त्यावर दरदिवशी हजारो वाहने कोकणच्या तळकोकणात जातात. तर कोकणातून मुंबई दिशेला ये-जा करत यामधून हजारो प्रवासी प्रवास करतात. रात्रीच्या वेळेत याच मार्गाने शेकडो प्रवासी बसेसची वर्दळ असते.खचलेल्या भागामध्ये आजूबाजूला कोणतेही गाव नसून रस्त्याच्या दोन्ही बाजूस झाडे-झुडूपे असल्याने रात्रीच्या वेळी वाहनांच्या लाइटच्या उजेडाशिवाय काही नसते. जी दुर्घटना महाड सावित्री पुलावर घडली त्याच पद्धतीत याही ठिकाणी त्याची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. अशा परिस्थितीत देखील महामार्ग बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. खबरदारी म्हणून अद्याप या विभागामार्फत कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. या खचलेल्या भागामध्ये एखादे वाहन आल्यानंतर त्या ठिकाणी वाहनाला जम्प घेत निघून जावे लागते. तर हा भाग सरळसरळ उतारावरच असल्याने नवी वाहन चालकांना या ठिकाणचा अंदाज मिळत नसल्याने धोकादायक स्थिती निर्माण होते. तरी या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.होणाºया अपघाताला जबाबदार कोण?महाड तालुक्यात २ आॅगस्ट २०१६ मध्ये एक मोठी सावित्री पूल दुर्घटना घडली होती. त्या ठिकाणी जवळच असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे इतरांचे प्राण वाचले. मात्र, या कशेडी घाटामध्ये खचलेल्या ठिकाणापासून आजूबाजूच्या परिसरात घनदाट जंगलाशिवाय काहीच नाही. अशा वेळी जर रात्रीच्या वेळेस हा भाग खचून खाली क ोसळला तर कोकणातून या ठिकाणाहून वेगातून घाट उतरणारी वाहने सरळसरळ खोल दरीत कोसळू शकतील. अशी कोणतीच घटना होण्यापूर्वीच खबरदारीची पावले उचलणे गरजेचे आहे.सध्या या कशेडी घाट खचलेल्या ठिकाणची परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. दिवसा देखील जोपर्यंत वाहनचालक समोर पोहोचत नाही, तोपर्यंत खचलेला भाग लक्षात येत नाही. मात्र, रात्रीच्या वेळी तर काहीच दिसत नाही.आजही काही वाहक वाहने या ठिकाणाहून वेगाने घेऊन जात आहे. मात्र, रात्रीची खबरदारी म्हणून या ठिकाणी रेडियममध्ये बोर्ड किंवा सोलर सिग्नल बसवणे, तसेच खचत असलेल्या भागात तात्पुरते बॅरिगेट बसवणे अत्यंत गरजेचे आहे. तरी संबंधित खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी या भागाची गणपतीपूर्वी डागडुजी करणे गरजेचे आहे. सणादरम्यान याच भागातून हजारो प्रवासी कोकणात जातात.कशेडी घाट ज्या ठिकाणी तडे जाऊन खचलेला आहे ते ठिकाण अत्यंत धोकादायक आहे. या संदर्भात महामार्ग वाहतूक शाखा पोलीस कशेडीमार्फत राष्टÑीय महामार्ग विभाग आणि पोलादपूर तहसीलदार यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून, महाडचे प्रांताधिकारी आणि पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना फोनद्वारे कळविण्यात आले आहे. खबरदारी म्हणून महामार्ग वाहतूक शाखेकडून बॅरिगेट लावण्यात आले आहेत.- एम. ए. गमरे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,वाहतूक पोलीस शाखा, कशेडीतातडीने दखल घ्यावीसध्याच्या परिस्थितीत कशेडी घाटातील खचलेला भाग हा अत्यंत धोकादायक आहे. या ठिकाणी राष्टÑीय महामार्ग हा कोकणवासीयांचा एकमेव जवळचा मार्ग आहे.अशा परिस्थितीत या मार्गाला कोणती मोठी दुर्घटना होऊ नये, प्रवाशांचा जीव धोक्यात येण्यापूर्वीच याची खबरदारी घेण्यात यावी, यासाठी महसूल विभाग, पोलीस प्रशासन तसेच राष्टÑीय महामार्ग विभाग यांनी याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

टॅग्स :Raigadरायगडroad safetyरस्ते सुरक्षा