मुरु डमध्ये आढळला काटेरी केंड मासा
By Admin | Updated: July 27, 2016 03:09 IST2016-07-27T03:09:28+5:302016-07-27T03:09:28+5:30
रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले हे मंगळवारी समुद्रकिनारी सकाळच्या प्रहरी फेरफटका मारावयास गेले असताना त्यांना कोटेश्वरी मंदिराच्या खालच्या

मुरु डमध्ये आढळला काटेरी केंड मासा
नांदगाव/ मुरुड : रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले हे मंगळवारी समुद्रकिनारी सकाळच्या प्रहरी फेरफटका मारावयास गेले असताना त्यांना कोटेश्वरी मंदिराच्या खालच्या बाजूस किनाऱ्यावर मृतावस्थेत काटेरी केंड मासा आढळून आला. ४१ सेंटिमीटर लांब तर २४ सेंटिमीटर रुंद असा हा मासा असून त्याच्या पाठीवर सर्व काटे आहेत. इंग्रजीत या माशाला पफर फिश म्हणून संबोधले जाते.
काटेरी कें ड मासा खोल समुद्रात समूहाने राहतो. याचे दात एवढे कठीण असतात की जाळी अगदी सहज तोडून हा पलायन करतो. जाळीत अडकलेली मासळी हा सर्व मास खाऊन सांगाडे शिल्लक ठेवत असल्याची माहिती कोळी बांधवांकडून मिळाली. याचे डोळे घुबडाप्रमाणे आहेत. याबाबत अधिक माहिती सांगताना मनोहर बैले म्हणाले, २३ जुलै १९८९ मध्ये समुद्रात अचानक तुफान व वादळ आले होते. यावेळी मोठ्या लाटांच्या प्रवाहात शेकडो बोटी बुडाल्या होत्या. असंख्य कोळी बांधव मृत्युमुखी पडले होते. त्या वेळी सुद्धा समुद्रकिनारी अशाच प्रकारचे मासे आढळून आले होते.