कबड्डी स्पर्धेत कर्नाळा स्पोर्टस पनवेल संघ अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:37 IST2021-02-26T23:36:54+5:302021-02-26T23:37:34+5:30
वडखळः रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन गावदेवी क्रीडा मंडळ मुंढाणी यांच्या विद्यमाने पेण तालुक्यातील मुंढाणी येथे घेण्यात आलेल्या रायगड जिल्हा ...

कबड्डी स्पर्धेत कर्नाळा स्पोर्टस पनवेल संघ अजिंक्य
वडखळः रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन गावदेवी क्रीडा मंडळ मुंढाणी यांच्या विद्यमाने पेण तालुक्यातील मुंढाणी येथे घेण्यात आलेल्या रायगड जिल्हा कुमारी गट अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत कर्नाळा स्पोर्टस अकादमी पनवेल संघाने अंजिक्यपद मिळवून कुमारी गटाची जिल्हा अजिंक्य पदाची हॅट्ट्रिक मारली. राजमाता जिजाऊ संघाचा पराभव .
या स्पर्धेतील अंतिम सामना कर्नाळा स्पोर्टस अकादमी पनवेल विरुद्ध राजमाता जिजाऊ कळंबोली या संघात झाला. सुरूवातीपासूनच पनवेल संघाने या सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली. पनवेल संघाची अष्टपैलू खेळाडू रश्मी पाटील, हिने अष्टपैलू खेळ केला. तर चढाई पटू रचना म्हात्रे हिने आक्रमक चढाया करत एकाच चढाईत तिन गडी मिळवत कळंबोली संघावर लोण दिला.
मध्यांतरापर्यंत पनवेल १४ गुण तर कळंबोली ८ गुण असा गुण फलक होता. मध्यांतरानंतर कळंबोली संघाची सोनम सांळुखे हिने एकाच चढाईत तीन गुण मिळवून सामन्यात चुरस निर्माण केली; परंतु तिचे प्रयत्न अपुरे पडले. अखेर हा सामना पनवेल संघाने २३- १५ असा जिंकून अजिंक्यपद मिळविले.या स्पर्धेत द्वितीय क्रमांक राजमाता जिजाऊ पनवेल, तृतीय क्रमांक दिलखूष आवास, चतुर्थ क्रमांक टाकादेवी मांडवास्पर्धेचे पारितोषक वितरण सामाजिक कार्यकर्ते प्रसाद भोईर, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष हिराचंद पाटील, सूर्यकांत ठाकूर आदींच्या हस्ते करण्यात आले.