कर्जतला आदर्श आगार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2016 23:54 IST2016-01-01T23:54:59+5:302016-01-01T23:54:59+5:30
एसटी आगार गेल्या सात - आठ महिन्यांपासून सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. एका चालकाने आगार व्यवस्थापकाचा प्रभारी पदभार स्वीकारल्यानंतर आगाराच्या उत्पन्नात लक्षणीय

कर्जतला आदर्श आगार करणार
कर्जत : एसटी आगार गेल्या सात - आठ महिन्यांपासून सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. एका चालकाने आगार व्यवस्थापकाचा प्रभारी पदभार स्वीकारल्यानंतर आगाराच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली. सध्या या आगाराचे उत्पन्न प्रथम क्र मांकाचे आहे. यासाठी सर्वांनीच मेहनत घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे आगार सुंदर, स्वच्छ व व्यसनमुक्त करून महाराष्ट्रातील आदर्श आगार करण्याचा संकल्प शुक्रवारी नववर्ष दिनी सर्वांनीच केला. त्यातच परिवहन मंत्र्यांनी व्यसनी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिल्याने हे सारे सोपे होत आहे.
नववर्ष दिनाचे औचित्य साधून एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावर पोलीस हवालदार जी. एल. पाटील, प्रभारी आगार व्यवस्थापक डी. एस. देशमुख, अनिल परब, अशोक गायकवाड, भरत ठोंबरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी दोन कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्त होण्याचा संकल्प केला. (वार्ताहर)