कर्जत पं.स. निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत
By Admin | Updated: October 24, 2016 02:42 IST2016-10-24T02:42:16+5:302016-10-24T02:42:16+5:30
पंचायत समितीच्या मार्च २०१७ मध्ये मुदत संपत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २४ आॅक्टोबर रोजी आरक्षण काढले जाणार आहे.

कर्जत पं.स. निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत
कर्जत : पंचायत समितीच्या मार्च २०१७ मध्ये मुदत संपत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २४ आॅक्टोबर रोजी आरक्षण काढले जाणार आहे. अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि ५० टक्के महिला आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
मार्च २०१७ मध्ये मुदत संपत असलेल्या कर्जत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २४ आॅक्टोबर रोजी कर्जत येथील कृषी संशोधन केंद्राच्या सभागृहात आरक्षण सोडत काढली जाणार आहे, की नव्या रचनेप्रमाणे मागील निवडणुकीत असलेल्या गणानुसार आरक्षण काढले जाणार? याबाबत कोणतीही माहिती निवडणूक प्रशासन यांच्याकडून देण्यात आली नाही. सकाळी ११ वाजता होणाऱ्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागांसाठी तसेच नागरिकांचा मागासप्रवर्ग यांचे आरक्षण काढण्यात आल्यानंतर त्यातील महिला आरक्षण काढले जाईल. त्यानंतर सर्वसाधारण राहिलेल्या गणांमधून देखील महिला आरक्षण काढले जाईल. ही सोडत कर्जत येथे होत असतानाच रायगड जिल्हा परिषदेसाठी देखील आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे त्या सोडतीकडे देखील राजकीय पक्षांचे पक्ष लागून राहणार आहे.
या आरक्षण सोडतीनंतर खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. आरक्षण जाहीर होताच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. त्यापासून राजकीय उलथापालथींना सुरु वात होणार आहे. (वार्ताहर)