कर्जत पोलीस ठाण्याचा जनरेटर अडगळीत

By Admin | Updated: May 13, 2017 01:05 IST2017-05-13T01:05:34+5:302017-05-13T01:05:34+5:30

कर्जतमध्ये वारंवार वीज प्रवाह खंडित होत असल्याने कर्जत पोलीस ठाण्यातील संगणकीय शासकीय कामकाज बंद पडून त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

Karjat police station's generator is inconvenient | कर्जत पोलीस ठाण्याचा जनरेटर अडगळीत

कर्जत पोलीस ठाण्याचा जनरेटर अडगळीत

नेरळ : कर्जतमध्ये वारंवार वीज प्रवाह खंडित होत असल्याने कर्जत पोलीस ठाण्यातील संगणकीय शासकीय कामकाज बंद पडून त्याचा विपरीत परिणाम होत आहे. परिणामी फिर्यादींना हवी असलेली एफआयआरची प्रत मिळण्यास, तसेच अन्य कामास अडथळा निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून सुमारे दोन वर्षांपूर्वी कर्जत पोलीस ठाण्यात लाखो रु पयांचा उच्च दाबाचा नवीन जनरेटर आणण्यात आला, परंतु हा जनरेटर अद्याप जोडला न गेल्याने अडगळीत धूळ खात पडला आहे.
काही महिन्यांपूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी लाखो रु पयांचा निधी उपलब्ध करून कर्जत पोलीस ठाण्याचे रु पडे बदलत त्याला कार्पोरेट लूक देण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधेपासून ते तक्र ार करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या आसन व्यवस्थेसाठी पोलीस ठाण्यात तसेच बाहेरही सोय करण्यात आली. मात्र याच पोलीस ठाण्यात सुमारे दोन वर्षापासून लाखो रु पयांचे नवीन जनरेटर उपलब्ध असूनही त्याची जोडणी मात्र केलेली नाही. तीच परिस्थिती आजही कायम आहे.
संगणकीय युग असल्याने कर्जत पोलीस ठाण्यातही संगणकाचा वापर करण्यात येतो. यामध्ये फिर्यादीची तक्र ार नोंदविणे, जबाब टाईप करणे, कंट्रोलला माहिती देणे, फिर्यादीला एफआयआरची प्रत देणे, पासपोर्ट आदी आॅनलाइन पत्रव्यवहारही होतो. यासाठी संगणक कायमस्वरु पी सुरू राहण्यासाठी वीजप्रवाह सुरळीत सुरू असणे अत्यंत गरजेचे असते. परंतु मागील काही महिन्यांपासून वारंवार वीज प्रवाह खंडित होत आहे. तसेच पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यात वीज खंडित होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे संभाव्य बाबींचा विचार करता यावर उपाय म्हणून उपलब्ध असलेल्या जनरेटरची जोडणी करणे आवश्यक आहे, जेणेकरु न वीज प्रवाह खंडित झाल्यास कामकाजात अडथळा येणार नाही.

Web Title: Karjat police station's generator is inconvenient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.