Karjat Municipal Council Subject Committee Election | कर्जत नगर परिषद विषय समिती निवडणुकीत युतीची बाजी

कर्जत नगर परिषद विषय समिती निवडणुकीत युतीची बाजी

कर्जत  : कर्जत नगर परिषदेमध्ये सोमवारी विविध विषय समित्यांची निवडणूक पार पडली. राज्यात शिवसेना-भाजप युती दुभंगली असली तरी कर्जत नगर परिषदेमध्ये ती भक्कम आहे. त्यामुळेच या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व उमेदवार युतीचे निवडून आले. हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले. कर्जत नगर परिषदेच्या सभागृहामध्ये पीठासीन अधिकारी तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्स विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्याधिकारी पंकज पाटील उपस्थित होते. 

पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी राहुल प्रल्हाद डाळिंबकर, वीज सार्वजनिक बांधकाम शहर नियोजन व विकास 
समिती सभापतीपदी स्वामिनी मांजरे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी संचिता पाटील यांची निवड झाली. 
उपसभापतीपदी प्राची डेरवणकर यांची बिनविरोध निवड झाली तर स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी पदसिद्ध म्हणून उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांची निवड करण्यात आली.

या व्हिडीओ कॉन्फरन्स सभेत १३ सदस्य सहभागी झाले होते. आता नगर परिषदेमध्ये १८ नगरसेवक आहेत, त्यापैकी १० नगरसेवक महायुतीकडे आहेत तर ८ नगरसेवक राष्ट्रवादी - मनसे -स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी-शिवराय भिमराय क्रांती संघटना या महाआघाडीचे आहेत.  

Web Title: Karjat Municipal Council Subject Committee Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.