नवीन पनवेल : सुमारे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि देवीची मूर्ती चोरी झाल्याची घटना नवीन पनवेल शहर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सुदर्शन शिंगाडे आणि त्यांच्या परिवाराने करंजाडे येथील घर सामान तक्का येथील नवीन पत्त्यावर शिफ्टिंग करण्यासाठी वेबसाईटवरून पॅकर्सशी संपर्क साधला होता. कंपनीकडून तीन जण आले. ते घरातील सामान व्यवस्थित पॅक करीत असताना, सुदर्शन यांच्या पत्नीने सोन्याचे दागिने कपाटात ठेवले.
काय घडले?
कंपनीची माणसे आली असतानाच सिंगाडे यांच्या घरातील मुलगा रडायला लागल्याने शिंगाडे यांच्या पत्नी मुलाकडे गेल्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा नवीन घरात सामान उतरवले गेले, तेव्हा सोन्याच्या दागिन्यांसह मूर्ती ठेवलेली डबी गायब असल्याचे लक्षात आले. चौकशी केल्यानंतरही ती न सापडल्याने त्यांनी संदीप याच्यासह इतर दोघांविराधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.